पुणेकरांना दिलासा! शहरात आज हजारपेक्षाही कमी रुग्ण

पुणेकरांना दिलासा! शहरात आज हजारपेक्षाही कमी रुग्ण
Updated on

पुणे : पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी (ता.२०) आठवड्यात दुसऱ्यांदा तीन आकडी झाली आहे. शहरात आज ९३१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याआधी सोमवारी (१७ मे) ६८४ नवे रुग्ण आढळून आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत फक्त दोन वेळाच नवीन रुग्णांची आकडेवारी एक हजारांच्या आत आली आहे. यामुळे कोरोना पुण्यातून निरोप घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Consolation to the people of Pune Less than a thousand corona patients in the city today)

याउलट जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र कोरोना रुद्र रुप धारण करून लागला आहे. केवळ जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात दररोज सरासरी दोन हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. आजही एकट्या जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ८५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने दररोज जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये ७१६, नगरपालिका हद्दीत २८२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात केवळ १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात ५ हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्वाधिक २ हजार ८४४ रुग्ण आहेत. पुणे शहरातील १ हजार ७६, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ९९, नगरपालिका हद्दीतील ६९६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यातील ९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसानंतर आज पहिल्यांदाच जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा हा शंभराच्या आता आला आहे. आजच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ४४ मृत्यू आहेत. पिंपरी चिंचवडमधील २९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १९ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

पुणे शहरात काल फक्त १,१६४ रुग्ण आढळले होते. आज त्या रुग्णसंख्येमध्ये आणखी घट झाली आहे. आज शहरात नव्याने फक्त ९३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६३ हजार १०३ इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ८८७ इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १५ हजार ०४३ रुग्णांपैकी १,३२८ रुग्ण गंभीर तर ४,३६० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात १२ हजार २२६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ०४ हजार ३२४ इतकी झाली आहे. शहरातील १ हजार ०७६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ४० हजार १७३ झाली आहे.

पुणेकरांना दिलासा! शहरात आज हजारपेक्षाही कमी रुग्ण
राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट 91 टक्क्यांवर

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात आज गुरुवारी 29,911 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, बुधवारी 34,031 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 54,97,448 झाली आहे. आज 47,371 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण 50,26,308 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आलं. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.43 टक्के एवढं झालं आहे. राज्यात आज रोजी एकूण 3,83,253 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.