बांधकाम विभागाकडून श्रीनाथ प्लाझामध्ये धडक कारवाई

शिवाजीनगर येथील संत ज्ञानेश्वर पादुका चौकात असलेल्या श्रीनाथ प्लाझा या व्यवसायिक इमारतीच्या विनापरवाना बांधकामावर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई
Construction department cracks down on Srinath Plaza unlicensed construction
Construction department cracks down on Srinath Plaza unlicensed construction sakal
Updated on

शिवाजीनगर : शिवाजीनगर येथील संत ज्ञानेश्वर पादुका चौकात असलेल्या श्रीनाथ प्लाझा या व्यवसायिक इमारतीच्या विनापरवाना बांधकामावर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मंगळवार (ता. ८) रोजी धडक कारवाई करण्यात आली. यावेळी सोळा लहान,एक मोठे अशा एकूण सतरा वाहनतळात (पार्किंगमध्ये) बांधण्यात आलेल्या विनापरवाना भिंती, शटर ,लोखंडी ग्रील, शौचालय इत्यादी वर कारवाई करून ते पाडण्यात आले.

यामुळे सुमारे पंधरा ते वीस कारसाठी पार्किंग उपलब्ध झाली आहे. यापैकी एका पार्किंग मध्ये पार्किंग पूर्णतः बंदिस्त करून तेथे पूल टेबलचा व्यवसाय यापूर्वी सुरू होता. ही सर्व जागा आता पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. यावेळी सुमारे अडीच हजार चौरस फूट पार्किंग मोकळे करण्यात आले. या कारवाईसाठी गॅस कटर, पंधरा बिगारी यांची मदत घेण्यात आली. सदर कारवाई बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक सहाचे उपअभियंता सुनील कदम ,कनिष्ठ अभियंता राहुल रसाळे. समीर गडई व इतर सहाय्यक सेवक यांच्यामार्फत कारवाई पूर्ण करण्यात आली.

'त्याच इमारतीमध्ये सोसायटीचे कार्यालय आहे ते साईड मार्जिन मध्ये बांधलं आहे, ते देखील पाडले जाणार आहे.आम्ही नियमित कारवाई करत असतो.श्रीनाथ प्लाझा मध्ये पाडलेले अनाधिकृत बांधकाम पुन्हा बांधले तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल'.

- सुनील कदम उपअभियंता बांधकाम विभाग झोन क्रमांक सहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.