Pune Crime : दुचाकीवरील तरुणाला चिरडून पसार झालेल्या कंटेनरचालकास सात महिन्यांनंतर अटक

पुणे-नगर रस्त्यावरील कल्याणीनगर चौकात दुचाकीवरील तरुणाला चिरडून अंधारात पसार झालेल्या कंटेनर चालकाला येरवडा पोलिसांनी अखेर सात महिन्यांनंतर अटक केली.
Crime
crimesakal
Updated on

पुणे - पुणे-नगर रस्त्यावरील कल्याणीनगर चौकात दुचाकीवरील तरुणाला चिरडून अंधारात पसार झालेल्या कंटेनर चालकाला येरवडा पोलिसांनी अखेर सात महिन्यांनंतर अटक केली. अपघातानंतर पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शंभराहून अधिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. या प्रयत्नांमुळे पोलिसांना आरोपी चालकाचा शोध घेण्यात यश मिळाले.

महम्मद अशीम हातीम अन्सारी (वय ३४, रा. कुन्हारा कला, जि. हजारीबाग, झारखंड) असे अटक केलेल्याचे चालकाचे नाव आहे. कल्याणीनगर भागात २० जानेवारी रोजी कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गौरव खंडारे गंभीर जखमी झाला. तर, मागील सीटवरील मित्र इशान सुनील करवडे (वय ३४) कंटेनरच्या चाकाखाली चिरडला. अपघातानंतर कंटेनर चालक अन्सारी घटनास्थळी न थांबता पसार झाला. या अपघातात इशानचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर येरवडा पोलिसांनी पसार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध सुरू केला. पोलिस कर्मचारी अनिल शिंदे यांनी शंभराहून अधिक सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात कंटेनरचा क्रमांक दिसून आल्यानंतर पोलिसांनी आरटीओ कार्यालयातील नोंदीवरून कंटेनरच्या मालकाचा शोध घेतला. अपघाताच्या वेळी अन्सारी कंटेनर चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अन्सारीला ताब्यात घेतले.

परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) छगन कापसे, पल्लवी मेहेर, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलिस कर्मचारी दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रेय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.