योगा, जिम्नॅस्टिक, अॅरेबिक्सच्या ऑनलाईन शिकवण्या चालू

Online-Class
Online-Class
Updated on

पिंपरी - लॉकडाऊन ची परिस्थिती आणि बरीच मुले बाहेरगावी गेल्याने योगा, जिम्नॅस्टिक, अॅरेबिक्स प्रशिक्षकांनी त्यावर ऑनलाईनचा शिकवणीचा तोडगा काढला आहे. 

शहरातील निरनिराळ्या प्रकारचे मैदानी खेळ लॉकडाऊन मुळे बंद झाले आहेत. त्याने, बहुतेक प्रशिक्षक, मुले आणि त्यांचे पालकांचा उत्साह मावळला आहे. मात्र, काही क्रीडा प्रशिक्षकांनी त्यावर देखील 'आॅनलाईन' तोडगा काढला आहे. 

जिम्नॅस्टिक प्रशिक्षक अभिश्री रजपूत म्हणाल्या, "फेसबुक लाईव्ह करून मुलांना शिकवता येऊ शकते. परंतु, त्याने, एखाद्या विद्यार्थ्यांने चूका केल्यास समजत नाही. हे लक्षात घेऊन लॅपटॉप किंवा मोबाईल वर विशेष अॅप डाउनलोड करून घेतले आहे. त्याच्या मदतीने मुलांना ऑनलाइन शिकवत आहे. त्याने, शिकविण्याच्या तंत्रात काही मोठा फरक पडत नाही. फक्त, त्यासाठी पालकांची मदत घ्यावी लागते.  इंटरनेटचा वेग कमी राहिल्यास किंवा काही वेळा आवाजाच्या समस्येला सामोरे जावे लागते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.