पुणे : ...म्हणून ठेकेदारांना जिल्हा परिषदेत 'नो एन्ट्री'!

ZP-Pune
ZP-Pune
Updated on

पुणे : पुणे शहरातील लॉकडाउनमधील काही नियम शिथिल केल्यानंतर जिल्हा परिषद मुख्यालयात वाढलेल्या ठेकेदार, कंत्राटदार आणि पुरवठादारांच्या गर्दीची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गंभीर दखल घेतली आहे. ही गर्दी रोखण्यासाठी ठेकेदारांना जिल्हा परिषदेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याची शुक्रवारपासून (ता.१५) अंमलबजावणी करण्यात आली आहे.

शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संक्रमनशील क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळून अन्य भागातील लाॅकडाऊन काही अंशी शिथिल केले आहे. यामुळे मागील दोन दिवसांपासून जिल्हा परिषद मुख्यालयात येणाऱ्या ठेकेदार, कंत्राटदारांची गर्दी वाढली आहे.

हे ठेकेदार विविध विभागातील थेट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर गर्दी करू लागले आहेत. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

हे ठेकेदार मोजमाप किंवा मोजणी पुस्तके (एम.बी.), अन्य रेकॉर्ड आणि देयके (पूर्ण झालेल्या विकासकामांची बिले) सादर करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु त्यांना या कामांसाठी जिल्हा परिषद मुख्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रवेशद्वारावर स्वतंत्र आवक-जावक विभाग सुरू करण्यात आलेला आहे.

या विभागात ठेकेदारांनी आणि  कंत्राटदारांनी त्यांची कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहनही प्रसाद यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.