निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार - खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी शिव गोरक्ष मंगल कार्यालय वेल्हे येथे सोमवार, (ता. २२) रोजी तालुक्यातील विविध विभागांच्या कामाच्या आढावाची बैठक आयोजित केली होती.
Supriya Sule
Supriya SuleSakal
Updated on
Summary

खासदार सुप्रिया सुळे यांनी शिव गोरक्ष मंगल कार्यालय वेल्हे येथे सोमवार, (ता. २२) रोजी तालुक्यातील विविध विभागांच्या कामाच्या आढावाची बैठक आयोजित केली होती.

वेल्हे - वेल्हे तालुक्यामध्ये विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी येत असला तरी अनेक ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करत असल्याची तक्रार नागरिकांनी करताच खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचे स्पष्ट केले .

खासदार सुप्रिया सुळे यांनी शिव गोरक्ष मंगल कार्यालय वेल्हे येथे सोमवार, (ता. २२) रोजी तालुक्यातील विविध विभागांच्या कामाच्या आढावाची बैठक आयोजित केली होती. यावेळी नागरिकांनी केलेल्या तक्रांबाबत बोलताना सुळे यांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसाठी सूचक वक्तव्य केले.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, संचालिका निर्मला जागडे, कात्रज दूध संघाचे संचालक भगवानराव पासलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकरराव भुरुक, महिला अध्यक्षा किर्ती देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत, बारामती मतदार महावितरणचे समन्वयक प्रवीण शिंदे, केळदचे सरपंच रमेश शिंदे, युवक कार्याध्यक्ष संदीप खुटवड, अंकुश पासलकर, प्रमोद लोहकरे, विकास नलावडे, सुधीर रेणूसे, गोरख भुरुक, राजूअप्पा रेणुसे, भोरचे उपविभागीय अधिकारी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय सकपाळ, महावितरणचे, नवनाथ घाटुळे, गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, गुंजवणी प्रकल्प जलसंपदा विभागाचे दिगंबर डुबल आदी उपस्थित होते.

यावेळी रेवणनाथ दारवटकर म्हणाले, 'वेल्हे तालुक्यापेक्षा कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस असून सुद्धा तेथील रस्ते सुस्थितीत राहतात वेल्हे तालुक्यात रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी येत असला तरी रस्त्यांचे डांबरीकरण ३१ मे पूर्वी होणे गरजेचे असताना अनेक ठेकेदारांनी जूनमध्ये डांबरीकरण केल्याने रांजणे ,खामगाव ,पाबे ,खरीव रस्ता किल्ले राजगड परिसरातील अनेक रस्ते अठरा गाव मावळ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून ठेकेदारांबरोबर अधिकारीही जबाबदार असून यांची चौकशी होणे गरजेचे आहे. तर भिमाजी देवगिरीकर म्हणाले गुंजवणी धरणाच्या पुनर्वसन गावठाणा मधील अनेक मूलभूत सुविधा अद्याप पूर्ण झाल्या नसून त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली.

आंबवणे गावाला जोडणाऱ्या सोंडे परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून शेकडो नागरिक व विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करत असतात हा रस्ता तात्काळ सुरू करावा अशी मागणी हनुमंत कार्ले यांनी केली. रांजने, कोंडगाव खामगाव आंबेड येथील प्रादेशिक योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून ठेकेदारांच्या हितासाठी ही योजना केली गेली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी भगवान पासलकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण राऊत तर आभार शंकरराव भुरुक यांनी केले.

बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना कान

पिचक्या देत तालुक्यामध्ये एवढे प्रश्न असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काय करतात असे म्हणत प्रत्येक महिन्यातील पहिला व तिसरा सोमवारी हा वेल्हे तालुक्यातील समस्या मांडण्यासाठी पुणे येथील कार्यालयात राखीव ठेवला असून कार्यकर्त्यांनी येऊन समस्या सोडाव्यात असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

वेल्हे तालुक्यातील एवढ्या समस्या असताना खासदारांना वेळ मिळतो पण आमदारांना मिळत नाही आमदार संग्राम थोपटे यांनी एकही आमसभा घेतली नसल्याने समस्यांचा डोंगर वेल्हे तालुक्यात उभा राहिल्याची चर्चा यावेळी नागरिक करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.