Sambhaji Bhide: "आपल्याला मिळालेलं स्वतंत्र दळभद्री अन्..."; संभाजी भिंडेंचे वादग्रस्त विधान

Sambhaji Bhide Controversial statement: पुण्यातील एका कार्यक्रमात संभाजी भिडेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. "वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे," असं सांगताना त्यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापण्याचं स्वप्नही मांडलं.
Sambhaji Bhide Controversial statement
Sambhaji Bhide Controversial statementesakal
Updated on

पुणे: शिव प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी सध्याच्या स्वातंत्र्याची तुलना "हांडग अन् दळभद्री" अशा शब्दांत केली आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. 

वादग्रस्त विधान

"आपल्या जे स्वतंत्र मिळालं ते हांडग स्वतंत्र आणि दळभद्री स्वतंत्र आहे," असं विधान करताना भिडेंनी सध्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यांचं म्हणणं आहे की हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वतंत्र आहे. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समाजात चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे.

वटसावित्री पूजा

वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनीच जावं, असं विधान भिडे यांनी केलं. तसेच "गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत," असं त्यांनी स्पष्ट केलं.

Sambhaji Bhide Controversial statement
राम गोपाल वर्माच्या मृत वडिलांच्या आत्म्याशी बोललेले श्यामक डावर; दिग्दर्शकाने स्वतः सांगितला किस्सा, म्हणाले-

हिंदवी स्वराज्य व्रत

भिडेंनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या लोकांच्या तुकड्या रायगडावर दररोज पाठवण्याचा मनोदय व्यक्त केला. "प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजारांची तुकडी करायची आहे," असे सांगताना त्यांनी संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं तयार करण्याचं आवाहन केलं.

वारकरी धारकरी संगम

पुण्यातील एका कार्यक्रमात संभाजी भिडेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. "वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे," असं सांगताना त्यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापण्याचं स्वप्नही मांडलं. 

Sambhaji Bhide Controversial statement
Mann KI Baat: ऑलिम्पिक ते आईची आठवण, निवडणूक जिंकल्यानंतर PM मोदींनी पहिल्या मन की बातमध्ये काय म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com