जलशुद्धीकरण केंद्राच्या वादग्रस्त निविदा; तीन अधिकाऱ्यांना नोटिसा

जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरूस्तीसंदर्भातील वादग्रस्त निविदा प्रकरणी महापालिका प्रशासनाने अखेर कारवाई सुरू केली आहे.
Pune Municipal
Pune MunicipalSakal
Updated on

पुणे - जलशुद्धीकरण केंद्राच्या (Water Purification Centers) देखभाल दुरूस्तीसंदर्भातील वादग्रस्त निविदा (Tender) प्रकरणी महापालिका (Municipal) प्रशासनाने अखेर कारवाई (Crime) सुरू केली आहे. या प्रकरणी पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. (Controversial Tenders for Water Purification Centers Notice to Three Officers)

खडकवासला रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, वारजे आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल- दुरूस्तीच्या कामाच्या सुमारे ३८ कोटी रुपयांच्या निविदा महापालिकेकडून काढल्या आहेत. त्या काढताना विशिष्ट ठेकेदार कंपनीला डोळ्यासमोर ठेवून, या निविदा काढल्या आहेत. त्यासाठी सेंट्रल व्हिजीलंन्स कमिशनच्या निकषांनादेखील फाटा दिला असल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतसुद्धा उमटले होते. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महापालिकेची बदनामी होत असल्याची टीका करून, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिले होते.

Pune Municipal
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ थांबविण्यासाठी समिती स्थापन न केल्यास दंड

त्यानुसार पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्याबरोबरच कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांना प्रशासनाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागातील तीन अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

- वरिष्ठ अधिकारी, महापालिका

वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वगळले?

निविदा प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या असल्या, तरी त्यांच्यावरील वरिष्ठ अधिकारी मात्र नामानिराळे कसे राहिले, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. निविदा मागविणे, निविदा रद्द करणे आणि फेरनिविदा मागविणे, अशा सर्व प्रस्तावांवर त्या अधिकाऱ्यांच्याही स्वाक्षरी आहेत. मला माहिती देण्यात आली नव्हती, असे कारण वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले, असे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Pune Municipal
पावसाच्या दमदार ‘कम बॅक’ने पुणेकरांची उडाली तारांबळ

दीड वर्षात तिसरी नोटीस

नोटीस बजावण्यात आलेल्या एका अधिकाऱ्याला गेल्या दीड वर्षातील ही तिसरी कारणे दाखवा नोटीस असल्याचे समजते. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत या अधिकाऱ्याने कोणतीही परवानगी न घेता एका ठेकेदाराच्या मदतीने परदेश दौरा केला होता. त्या वेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर तीन महिन्यांपूर्वी आयुक्तांनी आदेश देऊन, नालासफाईमध्ये दुर्लक्ष केल्याने त्यांना नोटीस बजावली होती. आता जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीच्या निविदांप्रकरणी तिसऱ्यांदा नोटीस दिली असल्याने महापालिका वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.