घ्या! 18 कोटींचा दंड भरला, पण पुणेकरांनी मास्क नाही घातला!

घ्या! 18 कोटींचा दंड भरला, पण पुणेकरांनी मास्क नाही घातला!
Updated on

पुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे हजारो नागरीक बाधीत होत आहेत, कित्येक नागरीकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहेत. महापालिका, पोलिस, जिल्हा प्रशासन वारंवार मास्क परिधान करण्याचे आवाहन करूनही नागरीक मात्र अजूनही विनामास्क फिरण्यालाच पसंती देत आहेत. पुणे पोलिसांनी वर्षभरात अशा तब्बल 3 लाख 54 हजार 969 माननीयांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 17 कोटी 85 लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे.

पुणे शहराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. कोरोनाबाधीत नागरीकांवर उपचार करताना आरोग्य व्यवस्थेची अक्षरशः दमछाक झाली आहे. त्यामुळे नागरीकांनी मास्क परिधान करावे, असे प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जात आहे. असे असूनही शहरात दररोज विना मास्क फिरणारे किमान दोन ते तीन हजार नागरीक पोलिसांना दिसत असून पोलिसांकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत आहेत.

घ्या! 18 कोटींचा दंड भरला, पण पुणेकरांनी मास्क नाही घातला!
पुण्यात लाखभर ज्येष्ठ लसीविना; २.७१ लाख ज्येष्ठांनी घेतला पहिला डोस

पोलिसांनी मागील वर्षभरात तीन लाख 54 हजार बेशिस्त नागरिकांकडून 17 कोटी 85 लाख रुपये इतका दंड वसुल केला आहे. कोरोना संसर्ग वाढत असतानाही नागरीक मास्क परिधान न करणे, सोशल डिस्टंन्सींगचे पालन न करणे अशा पद्धतीने शासनाच्या सुचनांचे उल्लंघन करीत आहेत. पोलिस विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांकडून 500 रुपये इतका दंड घेत आहेत. त्यावरुन पोलिस व नागरीकांमध्ये अनेकदा भांडणेही होत आहेत.

काही नागरीक मास्क तोंडाला लावण्याऐवजी तो गळ्यात किंवा कानाला अडकवितात. त्यामुळे त्यांच्यासह इतरांच्याही जीवाला धोका पोचू शकतो. म्हणूनच नागरिकांनी स्वतःसह इतरांच्याही आरोग्याच्या संरक्षणासाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी केले आहे.

घ्या! 18 कोटींचा दंड भरला, पण पुणेकरांनी मास्क नाही घातला!
भारतीय व्हेरियंटवर लस, कोरोनावरील उपचार प्रभावी; WHOचा निर्वाळा

परिमंडळनिहाय पोलिसांनी केलेली कारवाई

  • परिमंडळ एक - 78 हजार 137

  • परिमंडळ दोन- 52 हजार 761

  • परिमंडळ तीन - 62 हजार 121

  • परिमंडळ चार- 66 हजार 853

  • परिमंडळ पाच- 55 हजार 642

  • वाहतूक शाखा- 39 हजार 455

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.