पुणे : कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच जिल्ह्यात आतापर्यंतचा सर्वांधक कमी मृत्यूदर नोंदला गेला आहे. जिल्ह्यात १२ एप्रिलला ११. ४ मृत्यूदर होता. आता तो १.६ टक्क्यांपर्यंत कमी आला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
जिल्ह्यात १७ सप्टेंबरपर्यंत ही रुग्णसंख्या ८१ हजार ५४० पर्यंत वाढली. हा जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांचा उच्चांक ठरला. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या कमी होत गेली. अवघ्या ४८ दिवसांपूर्वी म्हणजे ११ फेब्रुवारीला सर्वांत कमी म्हणजे चार हजार ५८७ सक्रिय रुग्णांची नोंद आरोग्य खात्यात झाली होती. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला ५७ हजार ७७१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. सहा महिन्यानंतर आता सक्रिय रुग्णांची संख्या ५७ हजार ६९४ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.
- देशात कोरोनाचं विक्राळ रुप ते संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला; वाचा एका क्लिकवर
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही त्यामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने नोंदविले आहे. जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोनाने मृत्यूचे थैमान घातले होते. पण, त्यानंतर मृत्यूदर कमी होत गेला. सध्या हा मृत्यू दर १.६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे.
आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळाचे सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. संजय देशमुख म्हणाले, “कोरोनाच्या संसर्ग होणाऱ्या विषाणू वेगाने पसरत असला तरीही त्याची दाहकता कमी आहे. त्यामुळे संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी दिसत आहे.”
- Coronavirus Updates: नवजात जुळ्यांना कोरोनाची लागण
आतापर्यंत आपण वेगवेगळ्या साथरोगांशी लढा दिला आहे. तसाच लढा आता कोरोनाशी देत आहोत. त्याला आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लसीकरणाचे योगदान
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी गेल्या वर्षी आपल्याकडे कोणतेही साधन नव्हते. या वर्षी मात्र, कोरोना प्रतिबंधक दोन लशी आपल्याजवळ आहे. त्याचे मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू झाले आहे. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असल्याचे दिसते, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
यामुळे मृत्यू रोखता आले
- गेल्या वर्षभरात कोरोनाशी नेमकं कसं लढायचं याची शास्त्रीय माहिती मिळाली
- निदान आणि उपचार याचे मार्गदर्शक सूचना निश्चित झाल्या
- आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि डॉक्टरांचा अनुभव
- ऑक्सिजनचा पुरेसा साठा
- अत्यावश्यक औषधे उपलब्ध
- Rajinikanth : लार्जर दॅन लाईफ!
मृत्यूदरात पुणे चोविसाव्या स्थानावर
कोरोनाबाधितांच्या मृत्युदरात पुणे जिल्हा हा राज्यात चोविसाव्या स्थानावर आहे. राज्यात सध्या सर्वाधिक मृत्यूदर सांगलीमध्ये ३.४ टक्के असून, कोल्हापूर आणि रत्नागिरी (३.३ टक्के) यांचा क्रमांक लागतो. पुण्याचा मृत्यूदर १.६ टक्के आहे. पुण्यापेक्षा कमी मृत्यूदर असलेले दहा जिल्हे आहेत. त्यात बुलडाण्याचा मृत्यूदर एक टक्का असल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.