पुणे जिल्ह्यातील 'या' गावात कोरोनाचा शिरकाव

perne gaon.jpg
perne gaon.jpg
Updated on

कोरेगाव भीमा (पुणे) : कोरोना संसर्गाचा वेढा चोहोबाजूने पडलेला असतानाही सामूहिक प्रयत्नामुळे आजवर कोरोनामुक्त राहिलेल्या पेरणे गावात सरडे वस्तीवर अखेर कोरोनाने शिरकाव केलाच. तर बकोरी, तुळापूर तसेच वढु खुर्द येथेही सध्या एक- एक अॅक्टिव कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नगर रस्त्यावर पेरणे गावाने शासनाच्या मार्गदर्शक विविध उपाय योजनांच्या केलेल्या कडक अंमलबजावणीमुळे पेरणे गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता.

आज सरडे वस्तीवर एक जण बाधित आढळल्याने त्यास उपचारासाठी पुण्यात हलवले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांवर आरोग्य प्रशासन लक्ष ठेऊन आहे. दरम्यान तुळापूर, बकोरीमधील बाधितांच्या हायरीस्क कॉन्टॅक्टमधील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. कोरेगाव भीमासह लोणीकंद, डोंगरगाव, बकोरी, तसेच वाघोली, तुळापूर अशा चारही बाजूनी कोरोनाचे रुग्ण आढळलेले असताना पेरणे ग्रामपंचायतीने जीवनावश्यक बाबींच्या योग्य नियोजनासह लॉकडाऊनच्या काळात स्वच्छता, फवारणीसह कडक अंमलबजावणीस सुरुवात करुन आतापर्यंत गाव कोरोनामुक्त राखले होते. त्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कृती समिती, पोलिस यंत्रणा, आरोग्य विभागाचे प्राथमिक केंद्रासह सर्व कर्मचारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांसह ग्रामस्थांनीही मोठे योगदान दिले.
 

दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पेरणे ग्रामपंचायतीने दुकानदारांनाही दुकाने सायंकाळी पाच वाजताच बंद करायला लावत विना मास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु केली. तर मास्क न वापरणाऱ्या दुकानदारांवरही ५०० रुपये दंडाची कारवाई केली. यापुढेही अशी कारवाई चालूच राहणार असून कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सरपंच रूपेश ठोंबरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.