कोरोना मृत्यूमध्ये ‘साठी’च्या वरचे सर्वाधिक

कोरोना साथीचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शहरात कोरोनामुळे मृत्यू ओढवल्यांपैकी सर्वाधिक प्रमाण ६० वयापेक्षा जास्त वयोगटातील वृद्धांचे आहे.
Coronavirus
CoronavirusSakal
Updated on

पुणे - कोरोना (Corona) साथीचा सर्वाधिक धोका (Danger) ज्येष्ठांना असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शहरात कोरोनामुळे मृत्यू ओढवल्यांपैकी सर्वाधिक प्रमाण ६० वयापेक्षा जास्त वयोगटातील वृद्धांचे (Old People) आहे. मार्च २०२० ते जून २०२१ मध्ये झालेल्या मृत्यूच्या (Death) आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. जून २०२१ अखेर आठ हजार ६२६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (Corona is the Highest in Death for Sixty Years)

सीपीसी ॲनॅलिटीक्स या संस्थेने त्या वयोगटातील कोरोना बाधित आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या गुणोत्तराचा अभ्यास केला आहे. त्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. देशात कोरोनाच्या साथीला सुरवात झाली ती पुण्यातूनच. अगदी सुरवातीपासूनच ज्येष्ठांच्या काळजीसाठी विशेष प्रयत्न शहरात करण्यात आले होते. मात्र तरिही कोरोना मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण हे ज्येष्ठांमध्ये पाहायला मिळते. बाधितांच्या प्रमाणात मृत्यूचे गुणोत्तराचा विचार केल्यास, ६० पेक्षा जास्त वयोगटात ते मे २०२० मध्ये सर्वात जास्त होते. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये ज्येष्ठांच्या मृत्यूचा आकडा सर्वाधिक पाहायला मिळाला होता. ज्येष्ठां खालोखाल हे प्रमाण ४१ ते ६० या वयोगटामध्ये आढळते. विशेष म्हणजे पहिल्या लाटेत मे २०२० आणि दुसऱ्या लाटेत मे-जून २०२० मध्ये या वयोगटातील मृत्यूचे गुणोत्तर वाढलेले दिसते.

Coronavirus
"महाराष्ट्र धर्म महत्वाचा, इथं 'लव्ह जिहाद'ला थारा नाही"

कोरोना मृत्यूचा तपशील -

- सर्वाधिक कमी मृत्यू शून्य ते २० वयोगटात नोंदविले गेले

- ६० किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील मृत्यू इतरांच्या तुलनेने सातत्याने जास्तच

- पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे मृत्यू कमी

ज्येष्ठांची घ्या विशेष काळजी -

- सर्वात प्रथम ज्येष्ठांचे लसीकरण पुर्ण करावे

- लस घेतली तरी कोरोनाच्या नियमांचे पालन गरजेचे

- सहव्याधी आणि दुर्धर आजार असलेल्या ज्येष्ठांकडे विशेष लक्ष गरजेचे

- ज्येष्ठांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे

मार्च २०२० ते जून २०२१ मधील कोरोना मृत्यूचे प्रमाण -

वयोगट मृत्यू बाधितांच्या प्रमाणात मृत्यूची सरासरी टक्केवारी

१) ० ते २० ७० ०.००३

२) २१ ते ४० ७१० ०.०२३

३) ४१ ते ६० २,९२८ ०.०६५

४) ६० पेक्षा जास्त ४,९१८ ०.७६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()