किर्तन जगविण्यासाठी किर्तनकार झाले टेक्नोसॅव्ही !

अनेकांनी किर्तन ऑनलाईन केले तर, काहींनी उपजिविकेसाठी व्यवसाय सुरू करून किर्तनाची कला जिवंत ठेवली.
kirtankar
kirtankarsakal
Updated on

पुणे : गेल्या तीस वर्षांहून अधिककाळ किर्तन करणारे ज्येष्ठ नारदीय किर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांचे संपूर्ण कुटुंब हे किर्तनावरच अवलंबून होते, लॉकडाऊनची झळ त्यांनाही बसली. मात्र खचून न जाता त्यांनी ऑनलाइन किर्तनाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. त्याकरता आवश्यक ते नवीन तंत्रज्ञान समजावून घेतले आणि लॉकडाऊनमध्ये ५० हुन अधिक नवे किर्तनकार तयार केले....ही केवळ एकाच किर्तनकाराची कथा नाही तर, समस्त किर्तनकारांची व्यथा आहे. बदलांचा अंगीकार करीत त्यातून किर्तन जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. (corona lockdown effect kirtankar get online classes)

पुणे जिल्ह्यात वारकरी आणि नारदीय किर्तन शिकवणाऱ्या सुमारे 200 हुन अधिक संस्था आहेत. यातील सर्वाधिक संस्था आळंदीत आहेत. तसेच 250 हुन अधिक पूर्णवेळ किर्तनकार असून त्यांचाही शिष्यवर्ग मोठा आहे. अनेक किर्तनकार पूर्वी दरमहा सुमारे 20 ते 90 हजारांपर्यंत उत्पन्न मिळवत. मात्र लॉकडाऊनमुळे ते बंद झाले. आरोग्यावर आलेले गंडांतर टाळण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असताना समाजाचे मानसिक आरोग्य जपणाऱ्या किर्तनकार वर्गाकडे या कालावधीत समाजाचे दुर्लक्ष झाले. किर्तनावर अर्थाजन अवलंबून असलेल्या अनेक किर्तनकारांनी या काळात बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरली अन ध्येय कायम ठेवत प्रवासाचा मार्ग बदलला. अनेकांनी किर्तन ऑनलाईन केले तर, काहींनी उपजिविकेसाठी व्यवसाय सुरू करून किर्तनाची कला जिवंत ठेवली.

श्रेयस बडवे हे युवा किर्तनकार. त्यांच्या पत्नी आणि आई-वडीलही किर्तनकार आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांनी स्वतःचा यूट्युब चॅनल सुरू करून किर्तन जोपासले. तसेच, गायिका मंजुषा पाटील यांच्या काणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून किर्तनात तबला पेटीची साथ देण्याऱ्या सहवादकांनाही मदत मिळवून दिली. तर, भोर तालुक्यातील उमेश शिंदे या युवा किर्तनकाराने आणि त्याच्या साथीदारांनी स्वखर्चातून स्वतःची निवासी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. या गुरुकुलात कोरोना कालावधीत ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थांना मोफत कीर्तन शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थांना देखील अत्यल्प शुल्कात किंवा परिस्थितीनुसार मोफत वारकरी कीर्तन शिकवले जाते.

kirtankar
‘सीईटी’साठी २ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार

आळंदीतील अविनाश महाराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्तीशक्ती संघाची स्थापना केली. त्यातून पूर्णवेळ किर्तनावर अवलंबून असलेल्या किर्तनाकारांना अन्य व्यवसाय सुरू करून देण्यासाठी मदत केली. त्याद्वारे अनेक किर्तनकारांनी स्वतःची भोजनालये, किराणा दुकाने, आईस्क्रीम पार्लर, वडापावची विक्री आदी व्यवसाय सुरू केले. तर, ग्रामीण भागातील सुमारे ५० टक्के किर्तनकार हे आता अर्थार्जनासाठी शेतीकडे वळले आहेत.

kirtankar
सहकारी पतसंस्था होणार अत्याधुनिक

संग्राम महाराज भंडारे (आळंदी) : खूप आधीपासूनच स्वतःचा व्यवसाय करावा असे मनात होते, परंतु किर्तनसेवेचे व्रत घेतल्याने त्याकडे लक्ष दिले नाही. लॉकडाऊनमध्ये मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सोबतच निस्वार्थपणे किर्तननाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची इच्छा पूर्ण झाली.

उमेश शिंदे (भोर) : पूर्वी किर्तनाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने, लॉकडाऊन लागल्यावर पाहिले तीन महिने अभ्यासाला वेळ दिला. पण नंतर भोवतालच्या नकारात्मक परिस्थितीला बदलण्यासाठी काही तरी कृती करण्याची आवश्यकता भासली त्याच प्रेरणेतून वारकरी शिक्षण संस्था सुरू केली.

-रोहित वाळिंबे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.