पुणे जिल्ह्यात शनिवारी कोरोना रुग्णांचे मृत्यू वाढले; दिवसांत १७ रुग्णांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.२९) दिवसभरात ९ हजार ७६९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
Decreased corona infection kolhapur
Decreased corona infection kolhapursakal
Updated on
Summary

पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.२९) दिवसभरात ९ हजार ७६९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) एकूण सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली आणि दिवसातील कोरोनामुक्त रुग्णांचे (Corona Free Patients) प्रमाण वाढत असले तरी शनिवारी (ता.२९) दिवसासातील कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) मृत्यूमध्ये (Death) मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी दिवसात १७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात शनिवारी (ता.२९) दिवसभरात ९ हजार ७६९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट १६ हजार २३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही सत्तर हजारांच्या आत आली आहे. शुक्रवारी (ता.२८) हीच संख्या ७५ हजार ९९१ इतकी होती. पाच दिवसांपूर्वी हीच संख्या ९३ हजार ६४२ वर गेलो होती.जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रोज शहर व परिसरात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. शूक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

Decreased corona infection kolhapur
तक्रारदार महिलेसोबतच फौजदाराने जुळविले सूत

दरम्यान, शनिवारी (ता.२९) दिवसभरात जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार ४१० नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ६४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ३७५, नगरपालिका हद्दीत २४३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९६ नवे रुग्ण सापडले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक ८ हजार २१५ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ४ हजार ८७४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ४९९, नगरपालिका हद्दीतील ५४९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सात, पिंपरी चिंचवडमधील चार. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात पाच आणि नगरपालिका हद्दीत एक मृत्यू झाला आहे. दिवसभरात कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.