मुंबईहून खेडला आलेल्या दोघांचे कोरोना रिपोर्ट... 

coronavirus
coronavirus
Updated on

कडूस (पुणे) : ताप, खोकला, सर्दीच्या आजारसह मुंबईहून खेड तालुक्‍यातील कडूसला आलेला आणि परत मुंबईला गेलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर वडगाव पाटोळे येथे मुंबईहून आलेल्या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खेड तालुक्‍याचे मुंबईशी कोरोना कनेक्‍शन जोडले आहे. या दोन रुग्णांमुळे तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या दोनने वाढली आहे.

राक्षेवाडी येथील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दहा दिवसांपासून खेड तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिर होती. परंतु, सोमवारी (ता. 25) त्यात आणखी दोनची वाढ झाली. मुंबईहून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. ताप, खोकला, सर्दी असताना आठवड्यापूर्वी मुंबईहून कडूस आणि दोन दिवसानंतर पुन्हा कडूसहून मुंबईला गेलेल्या व्यक्तीने मुंबईतील एका खासगी दवाखान्यात स्वतःची तपासणी करून घेतली. त्यात त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी बळिराम गाढवे यांनी दिली आहे. 

संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने संपर्कात आलेल्या ग्रामस्थांमध्ये चिंतेत भर पडली आहे. मात्र, दोन दिवस संपर्कात येऊनही त्याच्या आजाराबाबत व तपासणीबाबत सरकारी यंत्रणेने गांभीर्याने पाहिले नाही, याला चांडोली ग्रामीण रुग्णालयाचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. ग्रामीण रुग्णालयामुळे अख्ख्या कडूस गावाचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

दुसरा कोरोनाबाधित रुग्ण वडगाव पाटोळे गावात सापडला आहे. संबंधित व्यक्ती दोन दिवसांपूर्वी कुटुंबासह मुंबईहून गावी आली आहे. त्याचा तपासणी अहवाल आज प्राप्त झाला. या दोन्ही कोरोनाबाधित व्यक्ती मुंबईहून आल्या असल्याने खेड तालुक्‍याचे मुंबईशी कोरोना कनेक्‍शन जोडले जात आहे. 'मुंबईहून गावी आलेल्या व्यक्तींनी नियमांचे पालन करावे, स्वतः होम क्वारंटाईन होऊन आपल्या गावाचे, कुटुंबाचे व नातेवाइकांच्या आरोग्याचे रक्षण करावे,' असे आवाहन सभापती अंकुश राक्षे व गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.