कोरोनानंतर बंद झालेल्या शाळा सुरू होण्यास मुहूर्त मिळेना

पालक-बालक शिक्षकही अस्वस्थ
School
Schoolesakal
Updated on

कॅन्टोन्मेंट : कोरोना महामारीमुळे पावणेदोन वर्षांपासून बंद झालेल्या शाळा सुरू होण्यास अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने पालक-बालक आणि शिक्षकही अस्वस्थ झाले आहेत. दिवाळीनंतर राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासाठी १ डिसेंबर २०२१ तारीख मुक्रर केली. मात्र, त्यातही विघ्न आले आणि पुन्हा १५ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू नयेत, असे संकेत आले. त्यामुळे आता पुन्हा शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

डिसेंबरच्या पहिल्या तारखेला शाळा सुरू होणार म्हणून पालकांनी मुलांना नवीन दप्तर, गणवेश खरेदी करीत, रिक्षा, स्कूल बस अशा सर्व बाबींची तयारी केली. शाळा सुरू होणार असल्याने चिमण्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहू लागला होता. मात्र, १ तारखेला शाळा सुरू न झाल्याने चिमण्यांचा हिरमोड झाला.

School
एसटी संप : भोकरदनमध्ये एसटी बसवर दगडफेक

दरम्यान, शाळा प्रशासनाबरोबर चिमुकल्यांना शाळेत पोहोचविणाऱ्या स्कूल बसचालक आणि रिक्षाचालकांनीही स्वच्छता मोहीम हाती घेतली होती, तीही आता थंडावली आहे. पेठांमधील महापालिकेच्या शाळांबरोबर खासगी शाळांनीही स्वच्छता करीत मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मागिल दोन आठवड्यापूर्वी दै. सकाळमध्ये सांग सांग भोलानाथ शाळा सुरू होईल का अशी चिमण्यांची आर्त हाक दिली होती. ती खरी ठरली अशीही टिप्पणी पालकांनी दिली. मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना आता शाळेमध्ये खडू-फळा अभ्यास करीत सवंगड्यांबरोबर मस्ती करायला मिळणार आहे.

आणखी एक आठवड्याने शाळा सुरू होत आहेत. मुलांचे दररोज डबा, दप्तर, गणवेश ठिकठाक करीत रिक्षा किंवा स्कूलबसच्या थांब्यापर्यंत जायचे. पहिल्या दिवशी शाळेत जाऊन शिक्षकांची भेट घ्यायची आणि मुलांकडे लक्ष द्या, असे सांगायची पालकांना घाई झाली आहे. शाळा दुसऱ्या सत्रात सुरू होणार असली, तरी मुलांची चांगली तयारी होईल, असा विश्वास पालकवर्गातून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

School
अकोला : शिक्षक पतसंस्था निवडणुकीसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल

चिमुकल्यांनी शाळाच पाहिली नव्हती, ती मुले आता शाळेत जाताना पाहावयास मिळणार आहेत. वर्गात नवीन सवंगडी भेटणार आहेत, नवे दप्तर, नवी पुस्तके घेत वर्गाकडे मुले झेपावरणार आहेत. मोबाईलच्या स्क्रीनकडे गुंतलेली मुले आता पुन्हा पुस्तकामध्ये रममाण होणार आहेत. मोबाईलवरील नाईट नाही, तर पुस्तक आणि फळ्यावरील अक्षरे वाचणार आहेत. मोबाईलवरील बडबड गीताऐवजी आता थेट बडबड गीते म्हणार आहेत, याचा आनंद त्यांच्यासाठी मोठा असणार आहे, असे पालकांनी सांगितले.

म्हणाल्या की, प्रदीर्घ सुटीनंतर शाळा सुरू होणार असल्याने पालक आणि बालकांबरोबर शिक्षकही समाधानी दिसत आहेत. मुलांना केंद्रबिंद मानून शिक्षक कार्यरत असतात. शाळा सुरू झाली पाहिजे, असे सर्वांना वाटत होते, त्याबाबत एकदाचा निर्णय झाला ही बाब समाधानकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जाणार आहे, शाळा परिसराची स्वच्छता केली आहे. स्कूल चले हम असा गलका करीत मुले शाळेत येणार आणि आम्ही त्यांचे जल्लोषात स्वागत करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.