पुणे : पुणे महापालिकेने (pune corporation) उभारलेले जम्बो रुग्णालय(jumbo hospital), तेथील शेड मजबूत आहे. पुढील सहा महिने त्याचा वापर करणे शक्य आहे. त्यामुळे कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेची तयारी करत असलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला आहे. (corona third wave pune jumbo hospital strong)
महापालिकेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर जम्बो रुग्णालय उभारले आहे. तेथे ८०० खाटांची सुविधा असून ७०० ऑक्सिजनच्या खाटा आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना त्या काळात जम्बो रुग्णालय पुणेकरांसाठी वरदान ठरले. ऑगस्ट २०२० मध्ये जम्बो रुग्णालय सुरू झाले ते डिसेंबर महिन्यात बंद केले होते. त्यानंतर दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च २०२१ मध्ये पुन्हा वापर सुरू केला.
रुग्णसंख्या कमी झाल्याने ३० जूनपासून तेथील उपचार बंद केले आहेत. जम्बो रुग्णालयाचा शेड वर्षभर जुने असल्याने महापालिकेने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दिल्ली आयआयटीकडून ऑडिट करून घेतले असून, त्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आहे. या रुग्णालयाच्या शेडला कोणताही धोका नाही, त्यामुळे १२ जानेवारी २०२२ पर्यंत त्याचा वापरता येईल, असे दिल्ली आयआयटीने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.