पुणे - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्याच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आठवड्याला रुग्णांची वाढ अशीच राहिली तर पुण्यात दररोज 9 हजार नवीन रुग्ण सापडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून पुढील सात दिवसांसाठी काही सेवा पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनी याची माहिती दिली.
काय आहेत निर्बंध
चाचण्यांच्या दृष्टीने प्रमाण चांगलं आहे. एका दिवसात 29 हजार टेस्ट झाल्या आहेत. जितक्या टेस्ट जास्त तेवढे रुग्ण जास्त सापडत आहेत. काही भागात चाचण्यांचं प्रमाण वाढवायचं आहे. पण पॉझिटिव्हीटी रेट हा चिंतेचा विषय असल्याचं सौरभ राव यांनी सांगितलं.
आरोग्य सुविधा वाढवणार
आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देणार असल्याची माहिती सौरभ राव यांनी दिली. ते म्हणाले की, खासगी रुग्णालयांसोबत समन्वय सभा झाली, हॉस्पिटल बेड वाढवत आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक जितके बेड होते तेवढेच बेड 5 एप्रिलपर्यंत उपलब्ध करून देऊ. काही रुग्णालयांना कोविड रुग्णालय जाहीर करावे लागले. ग्रामीण भागात जिथं व्हेंटिलेटर वापरात नाहीत ते शहरासाठी वापरत आहे. शहरात ग्रामीण भागातील रुग्णही दाखल होत आहेत. गेल्या दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण, देशात सर्वात वेगवान लस देण्यात पुण्याचा पहिला नंबर, जिल्हाधिकारी स्वत: यावर लक्ष ठेवून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.