‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ प्रमाणपत्र घेणाऱ्यांनो सावधान; वाचा सविस्तर

warriors
warriors
Updated on

पुणे - अनेकांना ‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ असे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. प्रमाणपत्र मिळाल्याने खूष झालेले अनेक ’योद्धे’ सोशल मीडियावर झळकत आहेत. परंतु, या प्रमाणपत्राला कोणतीही शासकीय वैधानिकता नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेकांनी सोशल मीडियावर ही प्रमाणपत्रे आनंद व्यक्‍त करण्यासाठी अपलोडही केली. कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी, नातेवाईक त्यांचे कौतुक करतात. मात्र, अशी प्रमाणपत्र देण्याचे निकष काय आहेत? त्याविषयी शासकीय पातळीवर भूमिका जाहीर केलेली नाही.

अवमूल्यन नको 
सध्या सामाजिक संस्थांकडून कोरोना योद्धे किंवा महायोद्धे, असे प्रमाणपत्र दिले जाते. त्यातून प्रत्यक्षात काम करणारे पण, प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्यांचे अवमूल्यन करू नये. या प्रमाणपत्रांची काहीच वैधानिकता नाही, असे ॲड. शिवराज कदम-जहागीरदार यांनी सांगितले.

संबंधित संस्था, संघटनेच्या विश्वस्तांना पुरस्कार किंवा प्रमाणपत्र कोणाला द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार असतो. मात्र, प्रमाणपत्रामुळे सरकारी पातळीवर त्यांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत किंवा  त्याचे फायदेही मिळत नाहीत. अनेकदा संस्था स्वत:च्या प्रसिद्धीसाठी प्रमाणपत्र देतात.
- ॲड. शिवराज कदम-जहागीरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन

सरकारच्या आवाहनानुसार मी रक्तदान केले. कोरोना संकटात रक्तदान केल्याने गरजू रुग्णांना त्याचा उपयोग होणार आहे. रक्‍तदानाची दखल घेऊन मला एका प्रतिष्ठानकडून गौरविले.
- प्रमाणपत्र मिळालेला तरुण

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.