राज्यात आजच्याच दिवशी आढळला होता कोरोनाचा पहिला रुग्ण; कशी होती पुण्याची स्थिती?

Pune Covid Pandemic News
Pune Covid Pandemic NewsSakal
Updated on

Two years of pandemic :महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले 2 रुग्ण (First Corona Patient Found in Pune) आढळल्याच्या घडनेला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहे. पुण्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 9 मार्च 2020 रोजी आढळले. पुण्यात धायरी (Dhayari) परिसरातील रहिवासी असलेले दाम्पत्य त्यांच्या मुलीसह दुबईवरुन 40 लोकांच्याग्रुपसोबत पुण्यात परतले होते. मुंबई(Mumbai) येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 मार्चला त्यांचे विमान उतरले होते. त्यांनतर त्यातील प्रवासी मुंबई, नागपूर, पुणे सह राज्यातील विविध भागातील घरी परतले होते. पहिले रुग्ण सापडल्यानंतर सह प्रवाशांना कोणतेही लक्षण नसले तरी खबरदारी म्हणून स्वॅब टेस्ट करण्यात आले.(Pune Covid Pandemic News)

8 दिवसांमध्ये टेस्ट रिपोर्ट येण्यापूर्वीच पहिल्या 2 कोरोना (Corona) संशयित रुग्णांना 9 मार्चला पुणे महापालिकेच्या नायडु हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर दाम्पत्यांची मुलगी देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. कोरोना विषाणूचा प्रसार वेगात होत असल्याने दाम्पत्यासह मुंबई एअरपोर्ट ते पुणे दरम्यान प्रवास करणारा कॅब ड्राईव्हर देखील पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. (Corona's first patient was found on the same day in pune)

Corona Fight
Corona Fightsakal media
Pune Covid Pandemic News
...पण आजच्या महिला या उपभोगू शकतात का? डॉ. बाबा आढाव यांचा सवाल

जागतिक कोरोना महामारीच्या काळात पहिला रुग्ण आढळल्यापासून ते कोरोना प्रतिबंधक लस निर्मीतीमध्ये मुख्य केंद्र होईपर्यंत सर्व घडामोंडीचे केंद्रबिंदू पुणे ठरले. आत्तापर्यंत, संपूर्ण जिल्ह्यात 14.5 लाखांहून अधिक व्यक्तींनी कोरोनाची लागण झाली असून यापैकी 6.6 लाखांहून अधिक पुणे शहरातील आहेत आणि नागरी आणि राज्य आरोग्य प्राधिकरणांच्या मते, पुणे हे देशातील सर्वात जास्त प्रभावित शहरांपैकी एक होते. पुणे जिल्ह्यात तब्बल 19,682 रु्ग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद असून त्यापैकी 9,348 शहरातील आहेत.

Pune Covid Pandemic News
पुण्यातील साथरोग निदान, उपचार, नियंत्रणासाठी ‘महानगर सर्वेक्षण’ची साथ

पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, दुसऱ्या लाटेमध्ये पुणे सर्वात जास्त फटका बसला होता. तेव्हा 8 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी 8,600 लोकांना कोरोनाची लागण झाली होती.

तिसरी लाट ही पुणे शहरासाठी तुलनेने सौम्य होती कारण सक्रिय रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असली तरी, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा कमी होते. दुसऱ्या लाटेदरम्यान नोंदवलेल्या 30-35 टक्के रुग्णालयात दाखल होण्याच्या दरापेक्षा मोठी सुधारणा तिसऱ्या लाटेत झाली होती. ''आम्ही सतर्क आहोत आणि भविष्यातील कोणत्याही लाटेसाठी तयार आहोत," असेही वावरे यांनी यावेळी सांगितले

pune corona update
pune corona updatesakal media
Pune Covid Pandemic News
इंदापुरात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रस्ता रोको

पुणे शहरातील महाराष्ट्राचे निरिक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्यापूर्वीच राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्यासोबत पुढील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी पूर्वतयारी बैठका घेतल्या होत्या.

''आमच्याकडे कोविड चाचण्या करण्यात तीन मुख्य प्रयोगशाळांसह, 688 प्रयोगशाळांचा सहभाग होता. यापैकी महाराष्ट्रातील 479 प्रयोगशाळा या शासनामार्फत चालवल्या जात होत्या,” अशी माहितीही डॉ आवटे यांनी यावेळी दिली

Pune Covid Pandemic News
पुण्यात कोरोनाची दुसरी लाट ठरली प्रलयकारी

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ''साथीच्या आजाराचे पहिले काही दिवस प्रशासनातील प्रत्येकासाठी शिकण्यासारखे होते. “आम्ही परिस्थितीवर झपाट्याने निंयत्रणात आणली आणि साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक पावले उचलली. आम्ही GoI आणि WHO द्वारे प्रदान केलेल्या सामान्य मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा केली आणि ताबडतोब परदेशातील प्रवाशांची तपासणी सुरू केली. प्रभावी व्यवस्थापनामुळे पुण्याच्या ग्रामीण भागात मे 2020 अखेरपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या केवळ 48 होती,” प्रसाद म्हणाले.

corona
coronasakal
Pune Covid Pandemic News
पुणे जिल्ह्यात मंगळवारी २३९ नवीन कोरोना रुग्ण; एकही मृत्यू नाही

पुणे नॉलेज क्लस्टरचे सह-संस्थापक एल.एस. शशिधरा, ज्यांनी सार्वजनिक आरोग्य धोरणांसाठी विज्ञान-आधारित इनपुट प्रदान करण्यासाठी पीएमसी आणि इतर संस्थांसोबत जवळून काम केले, ते म्हणाले, “पुण्यातील लोकांनी यावेळी परिस्थीचा सामना केला आणि त्यांनी एक उत्तम आदर्श निर्माण केला की जर अधिकारी आणि नागरी समाज एकत्र येऊन महामारीचा सामना कसा करू शकतात.''

''पुणे हे साथीच्या रोगांचे हॉटस्पॉट का होते आणि त्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या का आढळून आली आणि कोरोनामुळे मृत्यू का नोंदवले गेले आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. पण, दुसऱ्या लाटेदरम्यान जीव वाचवण्यासाठी जलद प्रतिसाद महत्त्वाचा ठरला,” असेही ते म्हणाले

कॉर्पोरेट क्षेत्रानेही महामारीविरुद्धच्या लढाईत मोठा हातभार लावला. "जेव्हा कोरोनासारखे मोठे संकट जागतिक पातळीवर जनजीवन आणि उपजीविका विस्कळीत करत होते, तेव्हा एक मजबूत धोरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकत्र येऊ प्रयत्न करणे अत्यावश्य होते असे मला वाटत होते. हे लक्षात घेऊन, कोरोनासंबधीत प्रतिसादासाठी पुणे प्लॅटफॉर्म (PPCR) ची संकल्पना तयार करण्यात आली, कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांसाठी एक आभासी व्यासपीठ निर्माण केले होते.असे डॉ. सुधीर मेहता, मराठा चेंबरचे अध्यक्ष, समन्वयक आणि PPCR प्रमुख यांनी सांगितले. यामध्ये वाणिज्य, उद्योग आणि कृषी, 250 खाजगी आणि सरकारी रुग्णालये, 10 सरकारी कार्यालये, 150 कॉर्पोरेट्स आणि ना-नफा क्षेत्रातील 50 सदस्यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.