विश्रांतवाडी (पुणे) : वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना टेस्टचे वेगवेगळे अहवाल आल्याने नागरिक संभ्रमित झाले आहेत. कोरोनाचा अहवाल एका खासगी हॉस्पिट्लमध्ये पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये निगेटीव्ह असा आला असून हा नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
२४ जूनला विश्रांतवाडी येथील एका महिलेची कोरोना टेस्ट करण्यात आली. एका लॅबमध्ये २६ जूनला त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मात्र, त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांनी २८ जूनला महापालिका अंतर्गत नेमलेल्या बुधरानी हॉस्पिटलमध्ये चाचणी केली. यामध्ये उकारडे यांचा अहवाल निगेटिव्ह आला. असे वेगवेगळे अहवाल आल्याने नागरिकांचा गोंधळ उडू लागला आहे.
दरम्यान, वेगवेगळ्या अहवाल देणाऱ्या खासगी लॅबवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिजित उकारडे यांनी केली. तसेच नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास अशा परिस्थितीत घाबरून न जाता महापालिका नियुक्त लॅबमध्ये चाचणी करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.