पुणे : एकीकडे कोविड-19 मुळे ठप्प झालेले उद्योग-व्यवसाय आणि दुसरीकडे शेअर बाजारातील घसरण, म्युच्युअल फंडाचे कमी झालेले मूल्य, मुदत ठेवींचे अत्यल्प व्याजदर, रिअल इस्टेटमधील मंदी या पार्श्व भूमीवर विश्वायसाचा आणि भरवशाचा हुकमी एक्का म्हणून सोने सध्या भाव खात आहे. जागतिक अस्थिरतेत या मौल्यवान धातूचे महत्त्व वाढते, याचा अनुभव आता सर्वांना येत आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण कायम राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोविड-19 च्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाउनची स्थिती आहे. स्वतःच्या जीवाबरोबर पैशाची, गुंतवणुकीची काळजी अनेकांना सतावत आहे. थोडक्याुत सध्या "हेल्थ आणि वेल्थ' हेच सर्वांच्या प्राधान्याचे विषय ठरताना दिसत आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अस्थिरतेत सोन्याचा आधार
मध्यंतरी तेजीच्या लाटेवर स्वार झालेला शेअर बाजार अलीकडे मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेअरमधील गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणात घटले आहे. तीच स्थिती म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची झाली आहे. दुसरीकडे निश्चि्त उत्पन्नाचा लोकप्रिय पर्याय असलेल्या मुदत ठेवींचे (एफडी) व्याजदर सहा टक्यांच्या आसपास आल्याने त्याचेही आकर्षण वाटेनासे झाले आहे. रिअल इस्टेटमधील मंदीत "कोविड'च्या संकटाने भर घातली आहे. वेतनकपात, नोकरकपात यासारख्या भीतीने तिथे मोठे धाडस करायला कोणी धजावताना दिसत नाही. अशा वेळी आपल्याकडे असलेला गुंतवणूकयोग्य पैसा सुरक्षित साधनांत जावा, अशी इच्छा प्रबळ होताना दिसत आहे. त्यादृष्टीने विचार करता, पारंपरिक सोन्यासारख्या मौल्यवान धातूचा लोकांना आधार वाटत आहे. त्याचीच प्रचीती बारामतीत एका दिवसांत झालेल्या प्रचंड सोनेखरेदीतून आली. विशेषतः ग्रामीण भागात सोने हेच गुंतवणुकीचे प्राधान्याचे साधन असते आणि सध्याच्या परिस्थितीने त्या "ट्रेंड'ला अजून पाठबळ मिळाले.
पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण
डिजिटल वा पेपरगोल्डला पसंती
अलीकडच्या काळात सराफी दुकाने बंद असल्याने नागरिकांनी गोल्ड ईटीएफ, गोल्ड फंड, गोल्ड बॉंड, गोल्ड बीज यासारख्या डिजिटल किंवा पेपरगोल्डच्या खरेदीला पसंती देत सोन्यात गुंतवणुकीची संधी साधली. अलीकडेच सरकारने "सॉव्हरिन गोल्ड बॉंड'चा पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला होता. त्यात सोने बाळगण्याची जोखीम राहात नसल्याने आणि काही प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने नागरिकांचा कल तिकडेही झुकताना दिसला. एकूणच संधी मिळताच नागरिक "फिजिकल' किंवा "डिजिटल' सोन्यावर उडी मारताना दिसत आहेत. आणीबाणीच्या क्षणी त्वरित पैसे उभे करण्याची क्षमता (तरलता) असलेल्या या धातूवरील भारतीयांचे प्रेम यानिमित्ताने अधोरेखित होताना दिसून येत आहे.
पुणे शहराच्या किमान तापमानात झाली वाढ; पुढील सहा दिवस...
सोन्याला बळ कशामुळे?
कोविड-19 च्या वाढत्या संकटाबरोबरच अमेरिका-चीनमधील ताणले गेलेले संबंध, अमेरिकेतील बेरोजगारीचा वाढलेला दर, युरोपमधील औद्योगिक उत्पादनाची निराशाजनक आकडेवारी यांमुळे सोन्याच्या भावाला आणखी बळ मिळाले आहे. भारतात मल्टी कमॉडिटी एक्स्चें जवर (एमसीएक्स ) जून गोल्ड फ्युचर्स 0.3 टक्यांपा नी वाढून प्रति 10 दहा ग्रॅमला 46,800 रुपयांवर पोचले. "एमएसीएक्सम'वर एका आठवडाभरात हा भाव 47,400 रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्य6ता वर्तविली जात आहे. "स्पॉट गोल्ड'चा भाव सध्या 10 ग्रॅमला 47 हजार रुपयांच्या आसपास आहे. थोडक्या त, तो विक्रमी पातळीच्या जवळच आहे. आगामी काळातील अपेक्षित अस्थिरता लक्षात घेता, हा भाव वर्षाखेरीपर्यंत 48 हजार ते 52 हजार रुपयांच्या पातळीत राहू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अर्थात हे भाव एका पातळीत फार काळ टिकणार नाहीत. त्यामुळे खरेदी-विक्रीचा निर्णय वेळेवर घ्यावा लागेल, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.
राणे विरुद्ध पवार ट्विटरवॉर; राणेंची शिवीगाळ अन् अरेतुरेची भाषा, तर...
जगभरातील मध्यवर्ती बॅंकांनी प्रोत्साहनपर आर्थिक पॅकेज जाहीर करायला सुरवात केली आहे. दुसरीकडे व्याजदर कमी ठेवले जात आहेत. त्यामुळे सोन्याचा भावाला आधार मिळत आहे. कोविडच्या संकटामुळे जगभरातील अर्थव्यवस्था सुधारण्यास मोठा काळ लागणार आहे. त्यामुळे सोन्याला मागणी येताना दिसत आहे. -प्रथमेश मल्ल्या, मुख्य विश्ले.षक, एंजल ब्रोकिंग लि.
भारतीय जनतेचे सोन्यावरील प्रेम कमी होऊ शकत नाही. या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात तरलता असल्याने सर्वसामान्य माणूस सोने खरेदी करीत असतो. डिजिटल स्वरूपातील सोनेदेखील ही सुविधा देऊ शकते. प्रत्यक्ष सोने सांभाळण्यापेक्षा ते बॉंड किंवा डिजिटल स्वरूपात ठेवल्यास सांभाळण्याची जोखीमही राहात नाही, शिवाय सोन्यात वाढदेखील होऊ शकते. सॉव्हरिन गोल्ड बॉंड घेतल्यास त्यावर वार्षिक परतावा मिळू शकतो. शिवाय भविष्यात सोन्याची भाववाढ झाल्यास त्याचाही लाभ मिळू शकतो. -महेंद्र लुणिया, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, विघ्नहर्ता गोल्ड
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर नागरिक सोने विकायला येणार नाहीत, उलट खरेदीच करायला येतील, असे मी आधीपासून म्हणत होतो. सोन्याचा भाव कमी झाला म्हणून किंवा वाढला तर आणखी वाढेल म्हणून नागरिक सोने घेतच असतात. त्यामुळे सोन्याचे आकर्षण कमी होणार नाही. कोविडमुळे लग्नसराईसारखे कार्यक्रम मर्यादित खर्चात करावे लागणार आहेत, त्यामुळे अशा कार्यक्रमांसाठी नियोजित केलेल्या रकमेपैकी शिल्लक राहणारी रक्कम सोन्यासारख्या मौल्यवान धातूतच गुंतविली जाईल. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर वाढला आहे, तर दुसरीकडे युरोपमधील औद्योगिक उत्पादनाला खीळ बसली आहे. सरकारच्या उपाययोजनांमुळे बॅंकांकडेही आता मोठ्या प्रमाणात तरलता आहे, पण कर्ज घ्यायला कोणी लगेच पुढे येईल, असे वाटत नाही. अशावेळी बाजारात अतिरिक्त राहणारा पैसा (लिक्विड फंड) सोन्याकडेच वळविला जाईल. - अमित मोडक, प्रसिद्ध कमोडिटीतज्ज्ञ
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गेल्या दीड-दोन महिन्यांत जगभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. याशिवाय जगभरात चालू असलेल्या कोविड-19 च्या संकटामुळे प्रवासी वाहतूक ठप्प झाली. भारत, अमेरिका आणि इतर देशातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. ही परिस्थिती कधी सुधारेल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. जेव्हा जगभरातील अर्थव्यवस्थेत इतकी अनिश्चिसतता असते, तेव्हा गुंतवणूकदार एका विश्वासार्ह माध्यमात गुंतवणूक करतात आणि ते म्हणजे सोने. म्हणूनच त्याच्या भावात इतक्या लवकर वाढ झाली आहे. दीर्घकाळाचा विचार करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. अमेरिकेतील आर्थिक मंदीनंतर सोन्याचा भाव तीन वर्षांनंतर शिखरावर पोचला होता, म्हणूनच सोने हे भविष्यात सर्वाधिक पसंतीचे गुंतवणूकमाध्यम राहील, असे वाटते.'' - सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.