कोथरुड (पुणे) : सदाशिव पेठे पाठोपाठ कोथरुड मधील औषध विक्रेत्याला कोरोनाची लागन झाल्याचे सिध्द झाल्याने कोथरुडकरांचे धाबे दणाणले आहे. पुणे शहरात कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढतच आहे. दोन आठवड्यापूर्वी सदाशिव पेठेतील घाऊक बाजारपेठेतून औषध घेऊन किरकोळ दुकानदारांपर्यंत ती पोहचवण्याचे काम करणा-या 38 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पुणे शहरात खळबळ उडाली होती. त्यामुळे 14 ते 16 मे दरम्यान औषधाची बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्यात आली होती. इतक्या कडक उपाय योजनेमुळे सदाशिव पेठेतील कोरोना शहराच्या इतर भागात जाणार नाही असे पुणेकरांना वाटले होते. परंतु इथेच फसगत झाली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोथरुड मधील औषध विक्रेत्याला कोरोना कसा झाला असावा याबाबत कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांना विचारले असता सदाशिव पेठेतील विक्रेत्यांशी आलेल्या संपर्कामुळेच कोरोना झाला असण्याची शक्यता व्यक्त केली. कदम म्हणाले की, या औषध विक्रेत्याच्या कुटूंबातील सर्वांची प्रकृती व्यवस्थित आहे. दुकानातही सोशल डिस्टंन्सिंग पाळले जात होते. औषधाची खरेदी विक्री चालू होती. त्यातून हा संसर्ग झाला असावा.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सदाशिव पेठेत घाऊक औषध विक्रेत्यांची संख्या चारशेहून अधिक आहे. शहराच्या एकाच भागात मोठ्या प्रमाणात होलसेल औषध विक्रीची दुकाने केंद्रित झालेली आहेत. कोथरुड आणि सिंहगड रस्ता परिसरात अशा स्टॉकीस्टची संख्या नगण्य आहे. त्यामुळे कोथरुडमधील औषध विक्रेते सदाशिव पेठेतील स्टॉकीस्टकडूनच औषधे घेतात. किरकोळ औषध विक्रेते स्वतः जावून किंवा डिलीव्हरी बॉईज मार्फत औषधे आणतात. सदाशिव पेठेचे हे कोरोना कनेक्शन कोथरुड पर्यंत पोहचले आहे. ते आणखी कीती जणांना बाधित करणार आहे याबद्दल शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळे शहराच्या एकाच भागात औषधांचे स्टॉकीस्ट असणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
----------
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?
---------
हिंमतवान ज्योतीला ट्रम्प कन्येचा सलाम
---------
रुग्णांना जीवदान देण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या डॉक्टर, परिचारीका पाठोपाठ औषध विक्रेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असेल तर आता आपण सुध्दा किती काळजी घेतली पाहिजे अशी धास्ती ज्येष्ठांकडून व्यक्त होवू लागली. आता औषध खरेदी तरी कोणाकडे करायचे या शंकेने नियमित औषध खरेदी करणा-या नागरिकांना ग्रासले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.