Corona_Update
Corona_Update

Coronavirus Updates: पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांचे नवे रेकॉर्ड

Published on

पुणे : गेल्या ३-४ दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. रविवारी पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ४२६, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार २७५ नवे रुग्ण आढळले आहेत. यावर्षी दोन्ही शहरांत कोरोनाचा हा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. 

पुणे शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ५९ हजार ५१२ एवढी झाली आहे. पुणे शहरात गेल्या २४ तासात २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५ हजार २१९ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत २ लाख २० हजार ७७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एका दिवसात दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या एक लाख ३४ हजार ५४१ झाली आहे. रविवारी एक हजार २८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख १६ हजार १७७ झाली आहे. 

सध्या १६ हजार ३९१ सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी पिंपरी-चिंचवडमधील ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून यापूर्वी मृत्यू झालेल्या पाच मृतांची माहिती रविवारी महापालिकेला देण्यात आली. 

आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमधील १ हजार ९७३ आणि शहराबाहेरील ८३० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत दोन हजार ६४३ रुग्ण उपचार घेत आहेत. १३ हजार ७४८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. तसेच १ लाख २३ हजार ४७० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २१० मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार २२६ मायक्रो असे एक हजार ४३६ कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार ३७ घरांना स्वयंसेवकांनी भेट दिली. ७३६ जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()