शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांचे नगरसेवकपद रद्द

पुणे महानगरपालिका २०१७ च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये प्रभाग क्र. १९अ मधून अॅड. भूपेन्द्र रामभाऊ शेडगे मनसे, अविनाश रमेश बागवे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार होते.
Avinash Bagwe
Avinash BagweSakal
Updated on

कॅन्टोन्मेंट - माजी गृहराज्यमंत्री आणि पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagave) यांचे चिरंजीव अविनाश रमेश बागवे (Avinash Bagave) यांचे नगरसेवक पद (Corporator Post) न्यायालयाने अपात्र (Canceled) ठरविले. (Corporator Avinash Bagave Corporator Post Canceled)

पुणे महानगरपालिका २०१७ च्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये प्रभाग क्र. १९अ मधून अॅड. भूपेन्द्र रामभाऊ शेडगे मनसे, अविनाश रमेश बागवे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. दि.४/२/२०१७ रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी अविनाश रमेश बागवे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये व नामनिर्देशन फॉर्ममध्ये दिलेली माहिती विसंगत व खोटी असल्या त्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती. मात्र, हरकत कोर्टाचा आदेश नसल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. निवडणूक निकालामध्ये अविनाश रमेश बागवे विजयी घोषित करण्यात आले.

Avinash Bagwe
धक्कादायक! कर्ज घेतलेल्यास फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्यांनी केली मारहाण

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया व वरील अर्ज छाननीच्या वेळी हरकत विचारात घेतली नसल्याने मे. मुख्य लघुवाद न्यायालय, पुणे येथे निवडणूक याचिका ५/२०१७ ही दाखल केली. निवडणूक याचिकेमध्ये झालेल्या साक्षी, तपासणी, उलटपासणी, पुरावे दाखल कागदपत्रे या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने दि.२९/६/२०२१ अविनाश रमेश बागवे यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे १९६९ चे कलम १०(१) (डी) अन्वये अपात्र ठरवून त्यांचे नगरसेवक पद हे रद्द केलेले आहे, अशी माहिती अॅड. भूपेन्द्र रामभाऊ शेडगे यांनी दिली.

दरम्यान, नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले की, २०१४ साली जुने बांधकाम घेऊन दुरुस्तीची परवानगी घेऊन त्याची दुरुस्ती केली. १९८६ सालच्या बांधकामाचा नकाशा पालिका प्रशासनाला मिळत नाही. त्यावेळी त्यांनी मागितल्याप्रमाणे खुलासा केला आणि मान्यही केला. २०१७ साली राज्य शासनाने २०१५ पूर्वीचे बांधकाम असेल तर त्या प्रशासनाचे पैसे भरून नियमित करता येते असा अध्यादेश काढला आहे. नगरसेवक किंवा अधिकाऱ्याचे बांधकाम महापालिकेने अवैध ठरवले तर ते योग्य आहे. कायदेशीर तरतुदी पूर्ण केल्या आहेत. बांधकाम विभागाने फक्त खुलासा मागितला होता, त्यानुसार खुलासा दिला. आम्ही याविषयी हायकोर्टात दाद मागणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.