Pune University : पुणे विद्यापीठातील भ्रष्टाचाराला आळा घाला; विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

अभाविपची मागणी; विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा
corruption in Pune University Alert of agitation for student demands ABVP
corruption in Pune University Alert of agitation for student demands ABVPsakal
Updated on

पुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, विद्यापीठांतर्गत दोन्ही उपकेंद्रांचे सक्षमीकरण करावे, परीक्षांचे निकाल वेळेत लावावेत,

रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, यांसह अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगर शाखेने दिला आहे.

विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री वीरेंद्र सिंग सोलंकी पुणे दौऱ्यावर आले आहेत. ते पुणे विद्यापीठासह इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या भेटी घेणार आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सोलंकी यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे, माध्यम संयोजक प्रतीक्षा लोहकरे आदी उपस्थित होते.

सोलंकी म्हणाले,‘‘विद्यार्थी परिषदेचे छात्र नेता विविध राज्यांतील विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आतापर्यंत आम्ही ३५० विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत. उच्च शिक्षणातील वाढलेल्या ताणामुळे होणाऱ्या आत्महत्या, विद्यार्थिनींचे प्रश्न सर्वत्र दिसत आहेत. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा करीत असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत.’’

हरपुडे यांनी सांगितले की, ‘‘पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांत पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्रत्येक महाविद्यालयात जाऊन आम्ही समस्यांचे सर्वेक्षण करणार आहोत. यात निदर्शनास आलेल्या मुद्द्यांवर लवकरच ‘विराट छात्र मोर्चा’ काढण्यात येईल.’’

‘अभाविप’च्या प्रमुख मागण्या

  • विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी

  • विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या परंतु शिक्षण न देणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी

  • नवीन वसतिगृह उभारणीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू करावी

  • विद्यापीठातील क्रीडांगण संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुले करावे

  • महाविद्यालयांकडून देण्यात येणारे अंतर्गत गुण पाठविण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.