महाराष्ट्रासह देशाला हादरविणाऱ्या कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणातील आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली.
पुणे - महाराष्ट्रासह देशाला हादरविणाऱ्या कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणातील आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये अटक केलेल्या एकूण 18 पैकी 11 आरोपींना न्यायालयाने साडे तीन ते 4 वर्ष पर्यंत ची शिक्षा सुनावली आहे. सायबर गुन्हेगारांनी बँकेचा स्विच सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी रुपये काढून घेतले होते.
गणेशखिंड येथील कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयात 11 ते 13 ऑगस्ट 2018 या कालावधीमध्ये सायबर चोरट्यांनी मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून तीन दिवसात 94 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम लुटली होती. त्यापैकी बहुतांश रक्कम भारतासह 26 देशांमधील एटीएममधून काढण्यात आली होती. तर हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेममधील ए.एल.एम ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर 13 कोटी रुपये वर्ग केले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश येथून आत्तापर्यंत 17 ते 18 जणांना अटक केली आहे.
संबंधित प्रकरण पुणे सत्र न्यायालयात दाखल होते. सायबर पोलिसांकडून आरोपी विरुद्ध पुरावे सादर करून आपली बाजू मांडण्यात आली होती. त्यानुसार, या प्रकरणामधील आरोपींना न्यायलयाने शनिवारी शिक्षा सुनावली. फाहीम मेहफुज शेख, फहीम अझीम खान, शेख मोहम्मद अब्दुल जब्बार, महेश साहेबराव राठोड, नरेश लक्ष्मीनारायण महाराणा, मोहम्मद सईद इकबाल हुसेन जाफरी उर्फ अली, युस्टेस अगस्तीन वाझ उर्फ अँथोनी, अब्दुल्ला असर्फली शेख, बशर अहमद अब्दुल अजीज शेख, सलमान मोहम्मद नईम बेग,फिरोज यासीन शेख अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना साडे तीन वर्ष ते 4 वर्ष पर्यंत ची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींची संख्या - 18
* पोलिसांनी परत मिळविलेली रक्कम - 6 कोटी
* दोषारोप पत्र दाखल - 1700 पानांच्या मुख्य दोषारोपत्रासह दोन पुरवणी दोषारोपपत्र
* बनावट कार्ड - 423
* भारतातील एटीएममधून काढलेली रक्कम - अडीच कोटी
* झालेले व्यवहार - 2 हजार 800
* व्हिसा कार्ड - 78 कोटी (व्यवहार 12 हजार)
* रुपे - अडीच कोटी (व्यवहार 2449)
* स्विफ्ट ट्रान्झॅक्शन 13 कोटी 92 लाख (व्यवहार 3)
एकूण रक्कम - 94 कोटी 42 लाख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.