पुणे : सम-विषम तारीख न पाहता (नो पार्किंग) रस्त्यावर लावलेल्या दुचाकीवर कारवाई केल्याने दाम्पत्याने डेक्कन वाहतूक विभागात गोंधळ घातला. पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. कारवाई टाळण्यासाठी दाम्पत्याने दुचाकीच्या वाहन क्रमांक पाटीवर बनावट क्रमांक टाकल्याचे उघडकीस आले आहे.