Pune News : आई आणि आज्जीला पोटगी देण्याचा मुलाला न्यायालयाचा आदेश

वयोवृद्ध आज्जी आणि आईला न सांभाळणे मुलाला महागात पडले आहे.
Court
Courtsakal
Updated on

पुणे - वयोवृद्ध आज्जी आणि आईला न सांभाळणे मुलाला महागात पडले आहे. दोघींच्या दैनंदिन खर्चासाठी त्यांना दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला आहे. सून त्रास देत असल्याने या प्रकरणातील मुलाच्या आईने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यात पोटगीबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अतकरे यांनी हा आदेश दिला आहे.

देखभाल खर्च मिळण्यासाठी दाखल केलेल्या या दाव्याच्या पहिल्याच सुनावणीत न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्यामुळे तक्रारदार सासुला मोठा दिलासा मिळाला. तिने ॲड. जान्हवी भोसले यांच्यामार्फत पोटगीचा दावा दाखल केला होता.

संगीता यांनी सून नेहा आणि मुलगा आदर्श यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केला होता. नेहा ही पतीला त्यांच्या आईला घरखर्चासाठी पैसे देवू देत नव्हत्या. तसेच ती सासूला विनाकारण व शुल्लक बाबींवरून त्रास देत. त्यामुळे संगीता यांनी मुलगा आणि सूनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान आदर्श हे त्यांची आई आणि आज्जी लता (सर्व नावे बदललेली) यांचा सांभाळ करत नव्हते. त्यामुळे आज्जीला दवाखान्यासाठी आणि आईला घरखर्चासाठी पैसे उपलब्ध होत नव्हते. त्याबाबत दाखल दाव्यात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत हा निकाल दिला.

या प्रकरणातील मुलगा एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्यांना दरमहा २५ हजार रुपये पगार आहे. तर त्यांची आज्जी आणि आई या आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे मुलावर अवलंबून, असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मुलाची जबाबदारी आहे की, त्याने आई आणि आज्जीला सांभाळावे. मात्र त्यांची पत्नी आईला पैसे न देण्याचा आग्रह करीत होती. या सर्व बाबी मी न्यायालयात मांडल्या.

- ॲड. जान्हवी भोसले, तक्रारदार महिलेचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.