पुण्यात कोव्हॅक्सिन संपले; कोविडशिल्ड १० हजार

पुण्यातील आजची स्थिती; केंद्रे ७० वरून १११
Vaccination
VaccinationMedia Gallary
Updated on

पुणे(Pune) : राज्य सरकारकडून(Maharashtra Government) पुणे महापालिकेला(PMC) दोन दिवसानंतर गुरुवारी रात्री १० हजार कोविडशिल्ड(Covishield) लसीचे डोस पुरविण्यात आले. दरम्यान महापालिकेने लसीकरण(Vaccination) केंद्रांची संख्या पुन्हा ७० वरून १११ केली आहे. कोव्हॅक्सिनची एकही लस न आल्याने ही लस(Vaccine) घेतलेल्यांना शुक्रवारी दुसरा डोस(Second Dose) मिळणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.(covaxin stock runs out and covishield 10 thousand dose available in Pune)

Vaccination
पुण्यात विविध केंद्रांवर डोस कमी, अन् गर्दीच जास्त

मंगळवारी राज्य सरकारकडून महापालिकेला तीस हजार लसीची पुरवठा करण्यात आला होता. त्यातून काल दिवसभरात १९ हजार जणांना लस देण्यात आली. बुधवारी सरकारकडून लशीचा पुरवठा होईल, असे अपेक्षित होते. मात्र, काल एकही डोस महापालिकेला मिळाला नाही. परिणामी महापालिकेने ७० केंद्रांवरच लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिल्लक राहिलेल्या डोसमधून आज या केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी लसीकरण होणार की नाही, अशी शंका निर्माण झाली होती.

Vaccination
कोरोना होऊन गेल्यावरही घ्या विश्रांती!

गुरुवारी रात्री सरकारकडून कोविडशिल्डचे दहा हजार डोस महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, कोव्हॅक्सिनचा एकही डोसचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे महापालिकेने उपलब्ध झालेल्या लसीचा साठा लक्षात घेऊन लसीकरण केंद्रांची संख्या ७० वरून १११ करण्यात आली. दुसऱ्या डोसला प्राधान्य महापालिकेने प्राप्त झालेल्या डोसमधून १११ केंद्रापैकी १०६ केंद्रांवर ७० टक्के डोस हे ४५ वर्षांवरील नागरीकांना दुसऱ्या डोस देण्यासाठी राखीव करण्यात आले आहे. तर ३० टक्के डोस हे पहिल्या डोससाठी राखीव असतील. २१ मार्चपूर्वी २०२१ पूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना दुसऱ्या डोससाठी उद्या प्राधान्य असेल. तर पाच केंद्रांवर केवळ दुसरा डोस देण्यात येणार आहे. मात्र, उद्या ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध नसतील.

Vaccination
‘म्युकरमायकॉसीस’संबंधीच्या औषधांबाबत यंत्रणा गाफील

एक केंद्र वाढविले

१८ ते ४४ वयोगटासाठी महापालिकेने लसीकरण सुरू केले आहे. मात्र, त्यासाठी पाचच केंद्र सुरू करण्यात आली होती. केंद्रांची संख्या आणि लस देखील कमी असल्यामुळे या गटातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. या केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी वारंवार होत आहे. त्यांची दाखल घेऊन महापालिकेने आणखी एक केंद्र वाढविण्याचा निर्णय घेतला असून ही संख्या सहावर नेण्यात आली आहे. या ६ केंद्रांपैकी २ केंद्रांवर कोविशिल्ड आणि ४ केंद्रांवर कोव्हॅस्किसन उपलब्ध असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.