पुण्यातील कडक निर्बंधांना व्यापाऱ्यांचा विरोध

15 मे पासून शिथिलता आणावी आणि दुकाने काही वेळ तरी उघडण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
Pune
Punee sakal
Updated on

पुणे : गेल्या महिन्यापासून दुकाने बंद असल्यामुळे व्यावसायिकांचे (Traders) आर्थिक कंबरडे मोडले आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना (Covid 19 positivity rate falls in Pune) आणखी कडक निर्बंध लावण्याची भाषा कशासाठी? कोरोनामुळे (Covid 19) निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यास लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कमी पडत आहेत का? असा प्रश्न शहरातील उद्योग-व्यावसायिकांनी शुक्रवारी उपस्थित केला. सध्याच्या निर्बंधांत 15 मे पासून शिथिलता आणावी आणि दुकाने काही वेळ तरी उघडण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Pune
पुण्यात लॉकडॉऊनची गरज नाही : महापौर

कोरोनाच्या रुग्णांची शहरातील संख्या कमी होत आहे. तरीही पुण्यात (Pune) कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानभवनात सांगितले. त्याला व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. लसीकरणाचा वेग वाढवा, आरोग्य सुविधा निर्माण करा असे म्हणत प्रत्येक वेळी नागरिकांना घरात बसविण्याची भाषा का, असेही त्यांनी विचारले. पुण्याचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. फक्त अत्यावश्यक सेवेशी संबंधित वस्तू विक्री आणि उद्योगांना सध्या परवानगी आहे. त्यामुळे उर्वरित सर्व व्यवसाय गेल्या महिन्यापासून बंद पडले आहेत. 15 मे नंतर थोडीफार शिथिलता मिळेल, असे वाटत असताना पवार यांच्या वक्तव्याने व्यावसायिक संतप्त झाले आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालये, वाहतूक सुरू मग दुकानेच बंद का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Pune
पुण्यात लसीकरण केंद्रांवर पुन्हा गोंधळ

व्यापारांचे मत काय

- सुरेश जैन (अध्यक्ष, पुणे शहर व्यापारी असोसिएशन) ः गेल्या दीड महिन्यांपासून व्यवसायांवर निर्बंध आहेत. तर, १४ एप्रिलपासून लॉकडाउन लागू झाला आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कर्जांचे हप्ते, भाडे, वीजबिल, कामगारांचे पगार कसे भागवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्याची परिस्थिती प्रशासनाने सक्षमपणे सांभाळल्यास नागरिकांचा त्रास कमी होईल.

- सचिन फिरोदिया (कार्याध्यक्ष, गणपती चौक व्यापारी असोसिएशन) १५ मे पासून दुकाने आठवड्यातून पाच दिवस तरी थोडा वेळ उघडण्यास परवानगी दिली पाहिजे. आता सगळे बंद असताना आणखी कडक निर्बंध काय लादणार? सध्याची परिस्थिती पाहता पुढे जम बसायला खूप वेळ लागणार आहे, याचा विचार करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने निर्णय घ्यायला पाहिजे. सरसकट निर्बंध हा काही उपाय नाही.

- नितीन पंडित (अध्यक्ष, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन) : सध्याच्या परिस्थितीत छोट्या व्यापाऱ्यांचे खूपच आर्थिक नुकसान झाले आहे. मागच्या परिस्थितीतून आता कुठेतरी सावरत आहोत.

Covid 19 lockdown news Traders oppose stricter restrictions in Pune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.