खडकवासला : हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नऱ्हे येथील कोविड केअर सेंटर आज सुरू करण्यात आले. सध्या येथे विलीनीकरण( क्वारणटाईन) साठी २०० खाटा, कोरोनाची चाचणी करण्यासाठी १०० खाटा, असे एकूण ३०० रुग्णांची या ठिकाणी व्यवस्था केली आहे. याबाबत माहिती देताना हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी सांगितले की, नऱ्हेतील बँक ऑफ महाराष्ट्र समोरील सिंहगड कॉलेजच्या वस्तीगृहात केंद्र सुरू केले आहे. आता केंद्रात दोन रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते दोघेही फ्रंटलाइन वर्कर आहेत. सध्या नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला व कोंढवे- धावडे परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी या परिसरातील कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही हे केंद्र आजपासून सुरू केले.
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हवेलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी सांगितले की, मागील वर्षी याच ठिकाणी कोविड केअर सेंटर सुमारे १६२ दिवस जे केंद्र सुरू होते. डिसेंबरमध्ये रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले होते. सध्या रुग्ण संख्या वाढल्यामुळे केंद्र पुन्हा सुरू करत आहोत. सध्या चार डॉक्टर व १५ नर्स व कर्मचारी दिले आहेत. हे केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, यांच्या सूचनेनुसार हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चौबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, डॉ. वंदना गवळी, डॉ.बाळासाहेब आहेर, नऱ्हे गावचे ग्रामसेवक बाळासाहेब गावडे यांनी पूर्ण केले. या परिसरातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या केंद्रासाठी पाठपुरावा केला आहे.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मागील वर्षीची अभिमानास्पद बाब
“मागील वर्षी १७ जुलै २०२० ते २५ डिसेंबर या १६२ दिवसात या कोविड केअर सेंटरमध्ये एक हजार १३५ रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. त्यांच्यावर विलगीकरणात त्यातील १०० रुग्णांची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. असे सर्वच्या सर्व म्हणजे एक हजार १३५ रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी गेले होते. ही महत्त्वाची अभिमानास्पद बाब आहे.” असे ही हवेलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.