पुणे महापालिका उभारणार लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल

स्वतंत्र ५० बेडची व्यवस्था; नऊ तज्ज्ञांची करणार भरती
.
.
Updated on

पुणे : लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस(Corona preventive vaccine) अद्याप आलेली नाही, त्यातही तिसऱ्या लाटेत लहान मुलांना (Children) व १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका जास्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतर्फे(PMC) येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात (Rajiv Gandhi Hospital) १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र ५० बेडचे(Bed) कोविड हॉस्पिटल ( covid Hospital) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नऊ बालरोग तज्ज्ञांची भरती(Recruitment of Pediatrician) केली जाणार आहे.(Covid Hospital for children to be set up by Pune Municipal Corporation)

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार आहे. पण, १८ वयोगटाखालील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. १ ते ९ वर्षांच्या मुलांना विविध लस दिल्या असल्याने त्यांची रोग प्रतिकारशक्ती जास्त असते, पण त्या तुलनेत १० ते १८ वयोगटातील मुलांची प्रतिकार शक्ती कमी होते. त्यांना कोरोना प्रतिबंधक लसही देता येत नाही. तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचे म्युटंट अधिक परिणामकारक राहतील आणि लहान मुलांमध्येही संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजीव गांधी रुग्णालयात ५० बेडचे खास कोवीड रुग्णालय सुरू करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून तसेच तज्ज्ञांची मते घेऊन लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये खास लहान मुलांसाठी ५० बेडचे कोविड रुग्णालय असेल. जेव्हा सर्व कुटुंब पॉझिटिव्ह असते, तेव्हा मुले आणि पालकही एकाच ठिकाणी उपचार घेतील, असा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेकडे सध्या नऊ बालरोग तज्ज्ञ आहेत, आणखी नऊ बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.

- रूबल अग्रवाल,

अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.