Career : ‘एआय’च्या मदतीने घडवा करिअर; ‘बेलवलकर ग्रुप’ आणि ‘सकाळ’तर्फे आज खास संवादाचे आयोजन

आर्ट्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, लॉ आदी कोणतेही क्षेत्र निवडले; तरी त्यात आता ‘एआय’चे (कृत्रिम बुद्धिमत्ता) बोट धरूनच करिअर घडवावे लागणार आहे.
artificial intelligence
artificial intelligencesakal
Updated on

पुणे - आर्ट्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, लॉ आदी कोणतेही क्षेत्र निवडले; तरी त्यात आता ‘एआय’चे (कृत्रिम बुद्धिमत्ता) बोट धरूनच करिअर घडवावे लागणार आहे. तसेच जे प्रोफेशनल्स विविध क्षेत्रांमध्ये आहेत, त्यांना टिकून राहण्यासाठी सतत नवनवीन कौशल्ये आत्मसात करावे लागणार आहे.

हे लक्षात घेऊन मुलांच्या भवितव्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘बेलवलकर ग्रुप’ आणि ‘सकाळ’तर्फे ‘एआय-धोके आणि संधी’ या खास संवादाचे आयोजन रविवारी (ता. २८) सकाळी १०.३० वाजता केले आहे.

‘एआय’मध्ये पीएच.डी. केलेले डॉ. भूषण केळकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

‘एआय’ म्हणजे काय, त्याचा वापर कसा आणि कोणकोणत्या क्षेत्रांत होतो, त्याचे महत्त्व काय, त्याची दहावी-बारावीपासून कशी तयारी केली पाहिजे, त्यासाठी कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, सध्याच्या अभ्यासाचे नियोजन कसे केले पाहिजे, या क्षेत्रात नव्या संधी कोणत्या आहेत, त्यांचा वापर करून आपले करिअर कसे घडवावे, या बाबत विद्यार्थी आणि पालकांच्या शंकाचे निरसन डॉ. केळकर करणार आहेत.

या प्रसंगी विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांनाही ते उत्तरे देणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना व्याख्यानाचा मोठा लाभ होणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक आणि प्रोफेशनल्स या सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

समाजासाठी उत्तरदायित्व या भावनेने बेलवलकर ग्रुप आणि ‘सकाळ’ यांच्यातर्फे संवाद आयोजित केला आहे. कोथरूडमधील मयूर कॉलनीतील एम. ई. एस. बालशिक्षणाच्या सभागृहात संवाद होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.