पुणे : देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 'चॅम्पियन्स' होण्यास मदत करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने www.Champions.gov.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. हे एक तंत्रज्ञान आधारित नियंत्रण कक्ष आणि व्यवस्थापन माहिती व्यवस्था असलेले संकेतस्थळ आहे. त्यासाठी आधुनिक टूल्सचा उपयोग करण्यात आला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
छोट्या उद्योगांना व्यापक बनवण्यात येणारे अडथळे दूर करणे, त्यांना पाठींबा व आवश्यक ती मदत करणे आणि वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. एमएसएमई मंत्रालयाशी निगडीत सर्व समस्यांचे समाधान या संकेतस्थळावर मिळू शकणार आहे.
आणखी वाचा - पुण्यात परप्रांतीय मजुरांकडे दुर्लक्ष का?
सध्याच्या कठीण काळात एमएसएमई उद्योगाना आधार मिळावा यासाठी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर (आयसीटी) आधारित व्यवस्था लावली जाणार आहे, असे संकेत एमएसएमई विभागाचे सचिव ए. के .शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार चॅम्पियन्स हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले. शर्मा यांनी या संकेतस्थळाची नुकतीच चाचणी घेतली. यावेळी देशातील 120 ठिकाणे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडली गेली होती. या विभागांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या संकेतस्थळाचा मोठा लाभ होईल, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला.
आपापल्या गावी परतणाऱ्या मजुरांना येत आहेत अशा अडचणी
सीआयटीची उपरकरणे, जसे टेलिफोन, इंटरनेट, व्हिडीओ कॉन्फरन्स यांच्या व्यतिरिक्त कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा विश्लेषण आणि मशीन लर्निंगच्या माध्यमातून देखील हे संकेतस्थळ वापरले जाऊ शकते. संपूर्ण सीआयटी संरचना ही नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) मदतीने तयार करण्यात आली आहे.
अरे बाप रे, अद्यापही 68 हजार मजूर पुण्यात अडकलेत
66 नियंत्रण कक्षांची स्थापना :
या व्यवस्थेचा भाग म्हणून नियंत्रण कक्ष हब एंड स्पोक पद्धती म्हणजे एककेंद्रीकृत विविध शाखा असलेल्या पद्धतीने बनवण्यात आले आहे. त्याचे केंद्र मुख्यालय नवी दिल्लीत आहे. तर त्याच्या विविध शाखा, विविध राज्यातली कार्यालये आणि संस्थांमध्ये राहतील. आतापर्यंत या व्यवस्थेचा भाग म्हणून विविध राज्यात 66 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
Coronavirus : पुण्यातली कोरोनाची परिस्थिती जेवढी चिंताजनक तेवढीच दिलासादायक
चॅम्पियन्स म्हणजे काय?
चॅम्पियन्सचा अर्थ आहे क्रियेशन अँड हार्मोनियस अप्लिकेशन ऑफ मॉडर्न प्रोसेस फॉर इन्क्रीझिंग द आऊटपुट अँड नैशनल स्ट्रेंथ (The CHAMPIONS). म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन आणि ताकद वाढवण्यासाठी एका आधुनिक प्रक्रिया असलेल्या सुलभ अप्लिकेशनची निर्मिती.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एमएसएमईला होणारे फायदे :
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यास होणार मदत
- एका क्लीकवर होणार समस्यांचे निरसन
- छोट्या उद्योगांची व्यापकता वाढणार
- व्यवसाय वाढीतील अडथळे दूर होणार
- आवश्यक ती मदत व प्रोत्साहन मिळणार
'एमएसएमई मंत्रालयाचा हा एक उत्तम उपक्रम आहे. आम्हाला आशा आहे की हा उपक्रम टिकविण्यासाठी मंत्रालयाने पुरेशी संसाधने उपलब्ध केली असतील. या संकेतस्थळावर प्रश्न आणि कल्पनांच्या समृद्ध डेटा बँकसह मंत्रालयाने ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात दररोजच्या ऑनलाइन संवादांचा विचार केला पाहिजे. जेणेकरून बहुतेक सामान्य प्रश्न सर्वात जास्त योग्य स्वरूपात संबोधित केले जातील.''
- प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ऍग्रिकल्चर' (एमसीसीआए)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.