स्मॉल फायनान्स बँकेत एकत्रीकरणाच्या अटींना पतसंस्था फेडरेशनचा विरोध

महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, धर्मादाय संस्था अशा तीनशेच्यावर संस्थांच्या रकमा अडकल्या आहेत
पतसंस्था फेडरेशन
पतसंस्था फेडरेशनsakal
Updated on

पुणे : पीएमसी बँकेचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत एकत्रीकरण करण्याबाबत युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने जाहीर केलेल्या अटींना एकमताने विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पत फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

पंजाब महाराष्ट्र को-ऑप. बँकेत महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, धर्मादाय संस्था अशा तीनशेच्यावर संस्थांच्या रकमा अडकल्या आहेत. या संदर्भात या संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे होते. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक वसंतराव शिंदे, महासचिव शांतिलाल शिंगी, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव आदी उपस्थित होते.

पतसंस्था फेडरेशन
कोरोना महामारीमध्ये मानसिक आधार ठरला महत्त्वाचा

या बैठकीत एकत्रीकरणाबाबत सादर केलेल्या योजनेतील अटी ठेवीदारांच्या दृष्टीने जाचक आहेत. विशेषतः संस्थात्मक ठेवीदारांच्या ठेवींपैकी ८० टक्के रक्कम शेअर्समध्ये हस्तांतरित करून केवळ एक टक्का लाभांश देण्याची योजना अव्यवहारी आहे. कोयटे यांनी एकत्रीकरणाऐवजी पीएमसी बँकेचे अवसायन करणे कसे योग्य होईल, याबाबत सादरीकरण केले. अवसायनाच्या माध्यमातून संस्थात्मक आणि वैयक्तिक ठेवीदारांनाही किमान ३५ टक्के गुंतवणूक त्वरीत परत मिळू शकेल. तसेच, उर्वरित रक्कमही दोन-तीन वर्षांच्या कालावधीत परत मिळू शकेल, अशी ही योजना आहे. या योजनेबाबत रिझर्व्ह बँकेचे संचालक मराठे यांच्यासह सर्व प्रतिनिधींनी अनुकूलता दर्शविल्याचे कोयटे यांनी सांगितले. या मुद्यावर उच्च न्यायालयात जाण्याचे अधिकार सर्व संस्थांच्या वतीने पतसंस्था फेडरेशनला देण्यात आले.मराठे म्हणाले, सर्व ठेवीदार संस्थांनी आपल्या हरकती रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदवाव्यात. या हरकतींबाबत व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करून सर्व ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. या प्रश्नाबाबत माधवपुरा सहकारी बँकेच्या धर्तीवर सहकार भारतीच्या वतीने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. या बैठकीस पतसंस्था फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक डी.एस.लक्ष्मण पाटील, शरद जाधव, वसंतराव शिंदे, भाई बाईगडे आदी उपस्थित होते. फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.