शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्‍टरवर गुन्हा 

44crime_logo_525_1.jpg
44crime_logo_525_1.jpg
Updated on

पिंपरी : शरीर सुखाची मागणी मान्य न केल्यास एका 36 वर्षीय महिलेला बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टराच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डॉ. विनायक पाटील (वय 38) असे त्या डॉक्‍टरचे नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 पासून पीडित महिला व तीचे पती अनेकदा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी जात. दरम्यान  महिलेची व डॉ. पाटील याच्यांशी ओळख झाली होती. त्यावेळी डॉक्‍टरने तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यानंतर त्याने अनेकदा महिलेशी बोलण्याच्या प्रयत्न केला. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण तीन दिवसांपूर्वी डॉक्‍टरने शरीर सुखाची मागणी करून "माझे फ्लॅटवर ये, नाही आलीस तर मी तूझी बदनामी करीन तसेच तुला जीवे मारून टाकीन'' अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्‍टरच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बनसोडे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.