वनातून अवैधरित्या खडी वाहतूकीमुळे चिंकारा हरीण गायब

इंदापूर येथील वनजमिनीतून रस्त्याच्या कामासाठी लागणारी खडी वाहनारे ट्रक सर्रासपणे जात असून, वनातील वन्यप्राण्यांच्या वास्तव्यावर गदा आली
crime news Chinkara deer extinct due to illegal transport of stones from forest indapur
crime news Chinkara deer extinct due to illegal transport of stones from forest indapur sakal
Updated on

कळस - कळस (ता.इंदापूर) येथील वनजमिनीतून रस्त्याच्या कामासाठी लागणारी खडी वाहनारे ट्रक सर्रासपणे जात असून, वनातील वन्यप्राण्यांच्या वास्तव्यावर गदा आली आहे. वनातून रात्रंदिवस ही अवजड वाहने खडी वाहतूक करत असून, वनविभागाने मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली असल्याचा आरोप येथील कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी केला आहे. ते म्हणाले, वनातून जाण्यासाठी वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक असताना येथून सर्रासपणे अवैध वाहतूक सुरू आहे. गावचे ग्रामदैवत हरणेश्वर असल्याने येथील चिकांरा हरणांना अभय आहे.

यामुळे या वनात कळपाने चिंकारि आढळून येत होते. परंतू या वाहतूकीमुळे कळपाने दिसणारे चिंकारा सध्या गायब झाले आहे. वाहनांच्या सोईसाठी अनाधिकृत मुरमीकरण करून व झाडे तोडून रस्ता तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाईपलाईनच्या कामाला अवैध ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणारा वन विभाग या प्रकाराकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करत आहे. यामुळे सदर प्रकारास वनराज्यमंत्र्यांचा पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. वनविभागास 21 फेब्रुवारीला निवेदन देवून सदर प्रकाराची कल्पना देत कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र वनविभागाने आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवली. यामुळे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वन विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

ही उदासीनता सदर खडी क्रशर मालक व ठेकेदार कंपनीने हात ओले केल्यामुळे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जैवविविधता धोक्यात येत असलेला हा प्रकार बंद न केल्यास आपण इंदापूरच्या वन धिभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत. दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सदर ठिकाणी पाहणी करून रस्ता बंद करण्याची सूचना संबंधित वनपाल यांना देण्यात आली आहे. यापूर्वी बाबामहाराज खारतोडे यांच्या तक्रारीनंतर संबंधितांवर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजच्या प्रकाराची माहिती घेऊन कारवाई करण्यासंदर्भात वनपाल यांना सूचना दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()