Crime News : पुणे पोलिसांकडून बनावट कॉल सेंटर उध्वस्त; लोनच्या नावावर व्हायची फसवणूक

Crime News : पुणे पोलिसांकडून बनावट कॉल सेंटर उध्वस्त; लोनच्या नावावर व्हायची फसवणूक
Updated on

पुणे - पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईतील बनावट कॉल सेंटर उध्वस्त केलं आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल आणि फसवणूक करण्यात येत होती. पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. (Pune Crime News in Marathi)

Crime News : पुणे पोलिसांकडून बनावट कॉल सेंटर उध्वस्त; लोनच्या नावावर व्हायची फसवणूक
Pathaan controversy : ...अन्यथा चित्रपटगृह पेटवून द्या; महंतांचा थेट इशारा, शाहरूख...

कॉल सेंटरमधून फेक कॉल द्वारे लोकांना लुटलं जात होतं. मुंबईतील मुलुंडमध्ये हे कॉल सेंटर होतं. येथे ४३ जण काम करत होते. या कारवाईत चाळीस मोबाईल, सात हार्ड डिस्क व इतर साहित्य दत्तवाडी पोलिसांनी जप्त केलं. लोन देतो म्हणून अडीच लाखांची फसवणूक झाली होती.

बिनव्याजी रक्कम देतो म्हणून कॉल सेंटरमधून लोणची ऑफर दिली जात होती. तसेच बजाज फिन्सर कंपनीच्या नावाने ही लूट सुरू होती. "नमस्ते, मी बजाज फिनसर्व्ह लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून सेल्स एक्झिकेटीव्ह बोलत आहे, असं येथील कर्मचारी नागरिकांना बोलत होते.

Crime News : पुणे पोलिसांकडून बनावट कॉल सेंटर उध्वस्त; लोनच्या नावावर व्हायची फसवणूक
Electricity : राज्‍यात औद्योगिक क्षेत्रातील वीजवापरात ग्राहकांच्या संख्येत होतेय दिवसेंदिवस वाढ

आरोपी हे महाराष्ट्रातील विविध शहरातील नागरिकांना फोन कॉल द्वारे बजाज इन्श्युरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करायचे. बजाज फिनसर्व्हची ५० लाख रुपयांची पॉलीसी काढल्यानंतर झिरो टक्के व्याज दराने पन्नास लाख रुपयांचे लोन मंजुर करुन देतो, असे सांगून नागरीकांकडुन त्यांचे आधारकार्ड, कॅन्सल चेक, फोटो या गोष्टी व्हॉटसअॅपवरुन घेवुन लोनचे सहा महिन्यांचे प्रिमीयम २,५०,०००/- रुपये होत असल्याचे सांगत त्या पैकी १,२५,००० रुपये लोन प्रिमियम म्हणून भरण्यास भाग पाडले जायचे. त्यानंतर नागरिकांची आर्थिक फसवणूक व्हायची.

Crime News : पुणे पोलिसांकडून बनावट कॉल सेंटर उध्वस्त; लोनच्या नावावर व्हायची फसवणूक
Karnataka Police : अमित शहांच्या सूचनेनंतर महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव प्रवेशावर बंदी?

भारतीय दंडात्मक कलम ४१९, ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना या कॉल सेंटरमध्ये एकुण ४३ मुले-मुली वेगवेगळ्या ठिकाणी बसुन फोन कॉल करताना दिसून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.