Pune Crime : पुण्यात आखाडपार्टी दरम्यान सराईत गुन्हेगाराचा भोसकून खून

या तरुणाचा खून पूर्ववैमनस्यातून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
murder case in pune
murder case in pune sakal
Updated on
Summary

या तरुणाचा खून पूर्ववैमनस्यातून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या पूना हॉस्पिटलजवळ एका तरुणाचा खून झाला आहे. दरम्यान, हा खून मध्यरात्री झाला असल्याची माहिती मिळत आहे. आखाडा पार्टी करत असताना अचानक वाद सुरु झाला आणि त्यानंतर या तरुणाची हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

murder case in pune
Latur : 30 मिनीटांत ढगफुटीसारखा पाऊस, पाण्याचा अंदाज नसल्याने पुलावरून दुचाकीस्वार गेला वाहून

दरम्यान, याप्रकरणी पोलिस रेकॅार्डवर असणाऱ्या बारक्या दोरी या आरोपीचा तिक्ष्ण हत्याराने खून केला असल्याची माहिती मिळत आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतकावर कोयत्याने वार केल्याच्या खूना आहेत. मध्यरात्रीपासून पुणे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे.

मिळालेली माहित अशी की, काल आखाडा पार्टी करण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, अनेक ठिकाणी ही पार्टी होते. पुण्यातील ही अनेक ठीकाणी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या पार्टीत एका तरुणाचा खूण करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या पूना हॉस्पिटलजवळ एका तरुणाचा खून झाला असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. आरोपीने तरुणावर वार करताना तीक्ष्ण हत्यार वापरले असल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय मृतकावर कोयत्याने वार केल्याच्या खूनाही दिसत आहेत. या घटनेमुळे पुणे परिसरात खळबळ उठली आहे.

murder case in pune
पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको- संजय राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.