20 कोटी खंडणी प्रकरण : कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर 'मोका' अंतर्गत कारवाई

गज्या मारणे याच्यासह१४ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल
Gangstar Gaja Marne
Gangstar Gaja Marne sakal
Updated on

पुणे : शेअर दलाल व व्यावसायिक व्यक्तीचे २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण करण्याच्या प्रकरणी अखेर कुख्यात गुंड गज्या उर्फ गजानन मारणे याच्यासह १४ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी याबाबत आदेश दिले.

गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली,पलूस, सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांविरुद्ध मोका कारवाई करण्यात आली आहे.

भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिक व शेअर दलालाचे अपहरण केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सोमवारी 4 जणांना अटक केली होती. त्यांनतर गज्या मारणे आणि साथीदार पसार झाले होते. दरम्यान, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

खंडणी विराेधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी मारणेसह साथीदारांच्या विरोधात "मोका" कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव अतिरिक्त पाेलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास पोलिस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी देऊन मारणे टोळीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले.या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत

...म्हणून गज्या मारणे आला पुन्हा पुणे पोलिसांच्या डोळ्यावर !

खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेने साथीदारांसह नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून काेथरुडपर्यंत फेरी काढली होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मारणे आणि साथीदार दहशत माजविली होती. या प्रकरणी मारणे याच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात पहिला गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणत टीकेची झोड उठल्यानंतर आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी हि पोलिसांना धारेवर धरले होते. तेव्हापासून मारणे पुन्हा पुणे पोलिसांच्या डोळ्यावर आला होता. त्यानंतर मारणेला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. मार्च महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर मारणे टोळीने पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.