गोवा राज्यातील मद्यसाठा पकडला; 39 लाख 18 हजाराची दारु जप्त

राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाची कारवाई : गोव्यातील विदेशी दारु वाहतुक करणारा ट्रक सारोळा ता.भोर येथे पकडला
crime news pune Action of State Excise Saswad Department Liquor stock seized in Goa state
crime news pune Action of State Excise Saswad Department Liquor stock seized in Goa statesakal
Updated on

नसरापूर : फक्त गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेली विदेशी दारु व बियर चा सुमारे 39 लाख 18 हजार रुपयांच्या मद्यसाठ्याची वाहतुक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाने पुणे सातारा महामार्गावर सारोळा ता.भोर येथे कारवाई करत पकडला असुन या प्रकरणी दोघांना अटक करत ट्रकसह सुमारे 49 लाख 25 हजाराचा मद्देमाल जप्त केला आहे.

फक्त गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेल्या मद्याची वाहतुक पुणे सातारा महामार्गावरुन होणार असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क पुणे सी बी रजपुत यांना समजल्यावर त्या माहीतीच्या अऩुषंगाने पुणे विभागाचे उपआयुक्त अनिल चासकर,अधिक्षक चरणसिंग रजपुत,उपअधिक्षक संजय पाटील,युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी सी शेलार राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे यांच्या पथकाने सातारा पुणे महामार्गावर सारोळा गावच्या हद्दीत उड्डाणपुलाच्या जवळ सापळा लावुन मिळालेल्या माहीतीच्या अधारे टाटा कंपनीचा ट्रक क्र.आर जे 32 जीए 5956 थांबवुन तपासणी केली.

असता ट्रक मध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेल्या बियरचे 500 मी.ली. चे 50 बाँक्स,व्हीस्कीचे 750 मि.ली. चे 150 बाँक्स,मँकडाँल व्हीस्कीचे 750 मी.ली.चे 250 बाँक्स,राँयल चँलेंजर्स व्हिस्कीचे 750 मी.ली.चे 50 बाँक्स,जार व्हिस्कीचे 750 मी.ली.चे 50 बाँक्स असा मिळुन 39 लाख 18 हजार रुपयांचा मद्यसाठा अढळुन आला या बरोबर कुजलेली लोकर किंमत 2 हजार रुपये, तीन मोबाईल फोन रुपये 5 हजार व वाहतुक करणारा ट्रक किंमत रुपये दहा लाख असा मिळुन 49 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाई मध्ये ट्रक चालक सुरेशचंद्र कलाल वय 36 रा.सियाल मांग्रीघाटी ता.देवगड जिल्हा राजसबंद व किसनलाल प्यारचंद खटीक वय 28 रा.धानेन ता.कोमलगढ जिल्हा राजसबंद यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. कारवाईच्या पथकात निरीक्षक पी सी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक राजेंद्र झोळ,आर एम सुपेकर,संदिप मांडवेकर, जवान अक्षय म्हेत्रे,भागवत राठोड,रणजित चव्हाण, राम चावरे,सुनिल कुदळे व दत्ता पिलावरे यानी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()