Pune News: पिंपळवंडी(ता.जुन्नर)येथील विक्रम(अक्षय)नारायण फुलसुंदर यांच्या राहत्या घराचे दरवाजे तोडुन ६ लाख ८३ हजार किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली.सदर घटना रविवारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घरी कोणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी हि चोरी केली.
मनोहर फुलसुंदर,विक्रम फुलसुंदर व त्यांची आई ललिता फुलसुंदर हे काल रविवारी(ता.१९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बाहेरगावी गेले होते.सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते घरी आले असतात त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडलेला दिसला.
त्यांनी त्वरित घरात जाऊन पाहिले असता बेडरूमच्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांना दिसले.बेडरूमधील लोखंडी कपाट उचकटुन लोखंडी कपाटाचे दोन लॉकरमधील सोने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती.
विक्रम फुलसुंदर यांनी सांगितले की १ लाख २ हजार रुपये रोख् रक्कम,१ लाख २५ हजार किंमतीचे सोन्याचे अडीज तोळे वजनाचे मंगळसुत्र,२.७९ग्राम वजनाचा सोन्याचा हार,३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,१७.५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन,५ ग्रॅम सोन्याची अंगठी,१९.६३ग्रॅम सोन्याची चैन,२१ ग्रॅम वजनाची पिळ्याची सोन्याची चैन असे एकुण ६ लाख ८३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.
सदर चोरीची माहिती फुलसुंदर यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला कळवली असता आळेफाटा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुनील बडगुजर व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले व पंचनामा केला.यावेळी पिंपळवंडीचे पोलीस पाटील इरफान तांबोळी घटनास्थळी उपस्थित होते.
सदर घटनेची फिर्याद विक्रम फुलसुंदर यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दिली असुन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक रागिणी कराळे या करत आहेत.
नागरिकांनी सतर्क राहावे व घराच्या परिसरात सि.सि.टी. व्ही. कॅमेरे तसेच सायरन बसविण्याचे आवाहन यावेळी आळेफाटा पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.