Crime: चोरट्यांनी पाण्याचे लोखंडी पाईपच नेले चोरुन, गावचा पाणीपुरवठा झाला विस्कळीत

Water Supply Ambegaon: सुमारे ९० लाख रुपये खर्चाची सार्वजनिक पाणी पूरवठा योजना दहा टक्के लोकवर्गणी भरल्यावर मंजूर झाली होती.
Crime: चोरट्यांनी पाण्याचे लोखंडी पाईपच नेले चोरुन, गावचा पाणीपुरवठा झाला विस्कळीत
Updated on

Pahaddara Pipe Theft: पहाडदरा ता.आंबेगाव येथील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाइनचे २० फुटी १० लोखंडी पाईप अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याने गेली चार दिवसापासुन येथील सार्वजनिक पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

या संदर्भात माहिती देताना पहाडदऱ्याचे सरपंच मच्छिंद्र वाघ यांनी सांगितले कि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेसाठी मेंगडेवाडी येथील डिंभे उजव्या कालव्या जवळ विहीर खोदून सुमारे तीन ते चार किलोमीटर तीन इंची लोखंडी पाईपची पाईप लाईन केली आहे. सुमारे ९० लाख रुपये खर्चाची सार्वजनिक पाणी पूरवठा योजना दहा टक्के लोकवर्गणी भरल्यावर मंजूर झाली होती.

त्या योजनेतून गावाला पाणी पुरवठा चालू होता. बुधवार (दि.3) रोजी काही शेतकरी जनावरे चारण्यासाठी डोंगरावर गेले असता पाईप कटर ने कापुन नेल्याचे निदर्शनास आले हि पाईपलाईन पहाडदऱ्या च्या घाटातून डोंगरातून येत असल्याने रात्रीच्या वेळी या परिसरात कोणी जात नसल्याने अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून २० फुट लांबीचे दहा लोखंडी पाईप कापून नेले आहे .

त्यामुळे ऐन शेतीच्या कामाच्या धावपळीत येथील ग्रामस्थांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गेली पाच दिवस याच परिसरात रात्री ड्रोन घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.त्यातच हा चोरीचा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. चोरटे चोरी करण्याच्या ठिकाणाची ड्रोन ने कदाचित अगोदर पाहणी करत असावेत अशी शंका उपस्थित केली जात आहे पाईप चोरीची व ड्रोनच्या घिरटयाची पोलिसांनी उच्च स्तरीय चौकशी करावी अशी मागणी सरपंच मच्छिंद्र वाघ,उपसरपंच कैलास वाघ, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, ग्रामपंचायत सदस्य संकेत वायकर व ग्रामस्थांनी केली आहे.

मागील दोन आठवड्यापूर्वी अवसरी बुद्रूक (हिंगे वस्ती ) ते पहाडदरा रस्त्यावरील पहाडदरा घाटात असलेले लोखंडी संरक्षक कठडे खांबासह उपटून चोरटयांनी चोरून नेले त्याचा अद्याप तपास लागला नसताना पाईप लाईनचे लोखंडी पाईप चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.