Crime: बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिन्यांची चोरी!

Crime: शिरूर तालुक्यातील ( पुणे ) मांडवगण फराटा येथील प्रकार
Crime: बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिन्यांची चोरी!
Updated on

Theft: मांडवगण फराटा ( ता. शिरूर ) येथील माजी शिक्षक रघुनाथ ज्ञानदेव हंडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

गुरूवारी ( ता. ९ ) रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला. चोरट्यांनी कपाटातील सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने रोख पन्नास हजार, चांदीचे दागिने, घरातील सुमारे दोन हजार रुपयांची चिल्लर असा सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

Crime: बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिन्यांची चोरी!
Mumbai Crime News: मुंबईत महिला डॉक्टरवर अत्याचार, ३८ वर्षीय व्यक्तीला अटक

सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथ हंडे हे काही दिवस हडपसर तर काही दिवस मांडवगण फराटा येथे राहतात. दसर्‍यानंतर ते मांडवगण हून हडपसर मध्ये गेले होते. दिवाळीच्या सणासाठी ते पुन्हा मांडवगणला गुरूवारी येणार होते.

मात्र घरी कुणीच नसल्याने पाळत ठेवून गुरूवारी पहाटेच दोन दुचाकींवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या गेटचे, शटरचे व दोन दरवाजाची कुलपे तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे तोडून त्यामधील सर्व ऐवज चोरून नेला.

Crime: बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिन्यांची चोरी!
Mumbai Crime: बेकायदेशीर बांगलादेशीला मुंबईत अटक!

चोरीची ही घटना गुरुवारी सकाळी वाघेश्वर मंदीरातील कर्मचारी दशरथ चव्हाण यांच्या लक्षात आली. त्यांनी हंडे यांना दूरध्वनीवरून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांनी मांडवगण येथे येऊन तात्काळ मांडवगण पोलीसांना दिली.

मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक संदीप यादव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप यादव करीत आहेत.

Crime: बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिन्यांची चोरी!
Crime: बायको अडकली लिफ्टमध्ये म्हणुन नवरोबाने सुपरवायझरला झोडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()