पुणे - बिअर बारमध्ये झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर पुलाजवळ शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री घडली.
हनुमंत ऊर्फ गोट्या दत्तात्रेय शेजवळ (वय ३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विकास सुभाष मुरकुटे (वय ३८, रा. औंध), विप्लब दुलाल सरकार (वय ४४, रा. क्लासिक गार्डन हॉटेल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर गणेश ऊर्फ काका कुलकर्णी (वय ३५) या संशयिताला ताब्यात घेतले आहे.