पुणे शहरात यावर्षी गेल्या तीन महिन्यांत रस्ता ओलांडताना ३० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पुणे - रस्त्यावर पहिला हक्क कोणाचा? असा प्रश्न विचारल्यास लगेच उत्तर मिळते. रस्त्यावर पहिला हक्क पादचाऱ्यांचा. परंतु शहरात यावर्षी गेल्या तीन महिन्यांत रस्ता ओलांडताना ३० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनचालकांनीही चौक पार करताना वेगावर नियंत्रण ठेवल्यास आणि नियमांचे पालन केल्यास पादचाऱ्यांचे अपघात टाळणे शक्य आहे.
शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात गतवर्षी २०२२ मध्ये १०७ प्राणांतिक अपघात झाले. या अपघातांमध्ये १०७ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर १२३ गंभीर अपघातांमध्ये १४५ पादचारी गंभीर जखमी झाले. तर यावर्षी २०२३ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत २८ अपघातांमध्ये ३० पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
पादचाऱ्यांना आवाहन
- थांबा, पहा आणि मगच रस्ता ओलांडा
- पदपथाचा वापर करा, पदपथ नसल्यास रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला
- वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा तऱ्हेने रस्त्याच्या कडेने चाला
- अधून-मधून किंवा दुभाजकावरून रस्ता ओलांडू नका, झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडा
- रस्ता ओलांडताना प्रथम उजवीकडे, नंतर डावीकडे पाहून वाहन येत नाही याची खात्री करूनच रस्ता ओलांडा
- दोन्ही बाजूंच्या वाहनांच्या नजरेत स्पष्ट याल, अशा ठिकाणीच रस्ता ओलांडा
- रस्त्यामधील रेलिंग्जवर उडी मारून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
- रस्त्यावरील रेलिंग्ज आणि दुभाजकाच्या कडेला चिकटून चालू नये.
- थांबलेल्या वाहनांच्या मागून किंवा पुढून रस्ता ओलांडू नका
- रस्ता ओलांडताना पाऊल पुढे हात समोर’ ठेवावा
- लहान मुले, महिला, ज्येष्ठ, दिव्यांग आणि अंध व्यक्तींना रस्ता ओलांडण्यास मदत करा
- एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत करा.
पादचाऱ्यांचे अपघाती मृत्यू होण्यामागे वाहनचालकांचा बेदरकारपणा हे मुख्य कारण आहे. परंतु पादचाऱ्यांनीही रस्ता ओलांडताना खबरदारी घ्यावी. घाईघाईने रस्ता ओलांडू नये. एका सुरक्षित ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित कसे जाता येईल, याची काळजी घ्यावी.
- हर्षद अभ्यंकर, संचालक- सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट.
वर्ष २०२३ मधील अपघात, पादचारी मृत्यू आणि जखमींची आकडेवारी
महिना प्राणांतिक अपघात मृत्यू गंभीर अपघात जखमी
जानेवारी ९ १० २० २३
फेब्रुवारी ९ १० ११ ११
मार्च १० १० १४ १७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.