किरकटवाडी-खडकवासल्यात केंद्रांवर तुफान गर्दी

अगोदरच हॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका; प्रशासनाने नियोजन करण्याची नागरिकांची मागणी
esakal
esakal
Updated on

किरकटवाडी(Pune) : कोरोना (Corona) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अगोदरच प्रशासनाने हॉटस्पॉट(Hotspot) म्हणून जाहीर केलेल्या किरकटवाडी(Kirkitwadi) व खडकवासला(Khadakwasla) (ता. हवेली(Haveli) या गावांमधील लसीकरण(Vaccine) केंद्रांवर नागरिकांची तुफान गर्दी होताना दिसत आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांकडून सोशल डिस्टसिंगच्या(Social Media) नियमांचे पालन होत नसल्याने रुग्ण संख्या अधिक वाढण्याचा धोका निर्माण होत असून प्रशासनाने लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिक करत आहेत.(crowd at vaccination center in Kirkatwadi-Khadakwasla)

esakal
लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून द्या : विजय शिवतारे

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरकटवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवासला या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. प्रत्येक केंद्रासाठी 350 डोस उपलब्ध असताना प्रत्यक्षात मात्र पाचशे ते सहाशे नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. परिणामी लसीकरण केंद्रांवर गोंधळ निर्माण होत असून कोरोना प्रतिबंधक नियमांचेही उल्लंघन होताना दिसत आहे.

सध्या खडकवासला येथे 66 तर किरकटवाडी येथे कोरोनाचे तब्बल 90 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. प्रशासनाने लसीकरणा संदर्भात योग्य नियोजन न केल्यास यामुळे पुढील काळात अधिक रुग्ण संख्या वाढू शकते.

esakal
Coronavirus : राज्यातील ८ जिल्ह्यासाठी ‘चेंबर’चा मदतीचा हात

सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांचा संताप.....

एकीकडे आम्हाला दारोदारी फिरून आमचा जीव धोक्यात घालून संशयित रुग्णांचा सर्व्हे करावा लागत आहे आणि दुसरीकडे नागरिक लसीकरण केंद्रांवर बेजबाबदार वर्तन करताना दिसत आहेत. प्रशासनाचे कोणतेही नियोजन नाही. सर्व्हेसाठी अनुपस्थित राहील्यास कारवाईचा धाक दाखविला जातो मग लसीकरणाबाबत योग्य नियोजन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार? असा संताप शिक्षक व्यक्त करत आहेत.

भावी नगरसेवकांची' जाहीरातबाजी......

लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्यास अपुऱ्या माहीतीच्या आधारे सोशल मीडियाच्या माध्यमातून 'भावी नगरसेवकांनी' केलेली जाहीरातबाजी कारणीभूत ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावरील मेसेज वाचून लसिकरणासाठी रांगा लावणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना अपुऱ्या लशींमुळे लस न घेताच माघारी जावे लागत आहे.

esakal
लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून द्या : विजय शिवतारे

"प्रशासनाचे लसीकरणासंदर्भात कोणतेही नियोजन नाही. नागरिकांची गैरसोय होत आहे. योग्य माहिती मिळत नसल्याने उपलब्ध लशींपेक्षा दुप्पट ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी येतात. गर्दी होत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे."

- विजय मते, खडकवासला

"उपलब्ध लशींचे वाटप प्रत्येक लसीकरण केंद्रासाठी समप्रमाणात करण्यात येत आहे. ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी आल्यानंतर नियमांचे पालन करावे. लसीकरण केंद्रांवर अनेक नागरिक हुज्जत घालतात. पोलीस प्रशासनाचेही सहकार्य आवश्यक आहे."

- डॉ. वंदना गवळी, आरोग्य अधिकारी, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र.

esakal
बारामतीत कुठल्या सेवा सुरू व बंद? वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.