Commonwealth Games : कॉमनवेल्थवर हडपसरच्या राऊत बहीणभावाची मोहोर

दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत येथील चिंतामणी व कादंबरी राऊत या बहीणभावाने सुवर्णपदक मिळवीत विजयाची मोहोर उमटवली आहे.
chintamani raut and kadambari raut
chintamani raut and kadambari rautsakal
Updated on

हडपसर - दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत येथील चिंतामणी व कादंबरी राऊत या बहीणभावाने सुवर्णपदक मिळवीत विजयाची मोहोर उमटवली आहे. या कामगिरीने क्रीडा क्षेत्रासह विविध व्यक्ती व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत जगभरातील एकूण ९७ देश सहभागी झाले होते. भारतातून खेळाडू सहभागी झाले होते.

कादंबरी बाळासाहेब राऊत हिने महिला सब ज्युनिअरच्या ६९ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. तीने स्क़ौट प्रकारत १५० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. बेंच या प्रकारात तीने ७५ तर, डेड या प्रकारात १४० किलो वजन उचलून रौप्य पदकाला गवसणी घातली.

तिच्या एकूण कामगिरीसाठी एक सुवर्ण तर तीन रौप्य पदकांनी तीला सन्मानित करण्यात आले. कादंबरी सध्या रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी येथील के. के. घुले विधयलात बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. प्राचार्य संजय मोहिते व शिक्षक प्रा. दिगंबर मेमाने यांचे मार्गदर्शन तीला मिळाले.

कादंबरीचा जागतिक विक्रम

कॉमनवेल्थ स्पर्धेतील गतवेळची विजेती साऊथ आफ्रिकच्या चेअंते मलदेर हिच्या नावावर १४५ किलो वजन उचलण्याचा जागतिक विक्रम नोंदवला गेला होता. कादंबरीने या स्पर्धेत १५० किलो वजन उचलून मलदेरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यानिमित्ताने कादंबरीने या स्पर्धेतील जागतिक विक्रमावरही मोहोर उमटविली आहे.

विशेष मुलांच्या ९३ किलो वजनीगटात चिंतामणी बाळासाहेब राऊत यांने भारताचे नेतृत्व केले. त्याने स्कॉट या प्रकारात १५० किलो बेंच या प्रकारात ७० किलो तर डेड या प्रकारात १८० किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. त्याला प्रशिक्षक टी. बाकीराज, स्पेशल ऑलिम्पिकच्या चेअरमन मेधा सोमय्या, सचिव डॉ. भगवान तलवारे, संचालक जितेंद्र ढोले, अशोक नांगरे, वडील बाळासाहेब राऊत यांचे मार्गदर्शन मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.