Cyber Fraud : सायबर फ्रॉड मध्ये फसवणूक झालेल्या तिघांचे पैसे परत

सायबर फ्रॉड मध्ये फसवणूक झालेल्या तिघांचे पैसे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाच्या पाठपुरवठयामुळे त्यांना परत मिळाले.
cyber crime
cyber crimesakal
Updated on

वाघोली - सायबर फ्रॉड मध्ये फसवणूक झालेल्या तिघांचे पैसे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाच्या पाठपुरवठयामुळे त्यांना परत मिळाले. तिघांची मिळून एक लाख रुपयांची फसवणूक झाली होती.

एकाची 89 हजार तर इतर दोन जणांची प्रत्येकी चार हजार व सहा हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाली होती. त्यानी याबाबत लोणीकंद सायबर विभागाकडे तक्रार केली होती. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सायबर विभागाने त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्वरित कार्यवाही केली.

पोलीसानी संबंधित मर्चंटकडे वारंवार पाठपुरवठा केला. त्यानंतर तक्रार दारांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले. लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरक्षक (गुन्हे) मारुती पोलीस निरक्षक (गुन्हे) सिमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, समीर पिलाणे, सागर पाटील, गणेश डोंगरे, कीर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावणी चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.